जालना : २ गावठी पिस्टल जप्त;

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Jalna Nayak    17-Aug-2026
Total Views |
 
जालना शहरातील रेवगाव रोडवर सुमित ऊर्फ गोल्या राजु भुरे यास दोन गावठी पिस्टलसह पोलिसांनी ताब्यात घेतले
 
जालना : जालना शहरातील रेवगाव रोडवर सुमित ऊर्फ गोल्या राजु भुरे यास दोन गावठी पिस्टलसह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुध्द तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधू साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असतांना सुमित ऊर्फ गोल्या राजु भुरे (वय २५ वर्ष, रा. कानडी बस्ती) हा त्याच्या ताब्यात दोन गावठी पिस्टल बाळगुन रेवगाव येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याचा शोध घेतला असता तो कलश सिडस बीएसएस फार्म समोरील रोडवर मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन दोन गावठी पिस्टल जप्त करण्यात आल्या असुन आरोपी विरुध्द तालुका पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची किंमत सुमारे ८० हजार इतकी आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभाग पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, फौजदार राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, देविदास भोजने, आक्रूर धांडगे, बाबा गायकवाड यांच्या पथकाने केली.