तीन दिवसांत 73 जणांना मिळाली नवी दृष्टी!

मोफत शिबीर: दृष्टी लायन्स नेत्रालय, नेत्रसेवा प्रतिष्ठानचा उपक्रम

Jalna Nayak    17-Aug-2026
Total Views |
 
परतुर आणि पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने दि. 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान आयोजित मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीर
 
तीन दिवसांत 73 जणांना मिळाली नवी दृष्टी!
मोफत शिबीर: दृष्टी लायन्स नेत्रालय, नेत्रसेवा प्रतिष्ठानचा उपक्रम
 
परतुर (प्रतिनिधी): जन्मतः डोळ्यांची पापणी पडणे ,तिरळेपणा, अपघाताने आलेले डोळ्यांचे व्यंग अशा विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना दृष्टी लायन्स नेत्रालय परतुर आणि पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने दि. 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान आयोजित मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीर वरदान ठरले.73 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने बेरंग जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश प्राप्त झाला.
लायन्सचे प्रांतपाल राहुल औसेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. उपप्रांतपाल योगेश जयस्वाल, माजी प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया ,झोन चेअर पर्सन रेवती राखे, नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, दृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर खालापुरे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.शुक्रवारी ( ता.14) 260 रुग्णांची तपासणी करण्यात आली. पैकी 85 जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली.दोन दिवस डॉ. मधुसूदन झंवर,डॉ.अनिल वायकुळे, डॉ.अमर टेकाळे, डॉ.गाडे, डॉ.पवार ,डॉ. वैभव वनारसे, डॉ. सुनंदा वनारसे, डॉ. गार्गी खैरनार, डॉ. धर्मराज भोईटे, डॉ. अनुजा गाडगीळ, डॉ. सचिन बगळे, डॉ. प्रतिभा बराटे ,डॉ.ललित शाह, डॉ. राजेंद्र लाहुरे ,डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. गणेश बांदल, डॉ. मनोज भायगुडे, यांच्यासह तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने 73 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.शिबिराचा तीन वर्षांच्या बालकांपासून ते उपवर मुली - मुलांना नवी दृष्टी प्राप्त झाल्याने रुग्णांसह पालकांच्या चेहरे आनंदाने फुलून गेले.जालन्यासह नांदेड, हिमायतनगर , बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश), बीड,परळी,नाशिक,मुर्तीजापुर ,अकोला , रिसोडसह अन्य जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घेतला.रविवारी ( ता.16) उपप्रांतपाल सुप्रिया कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचा समारोप झाला.यावेळी माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया, रिजन चेअरमन जयश्री लढ्ढा यांची प्रमुख उपस्थिती होती.तीन दिवस रुग्णांसह नातेवाईकांची निवास, भोजन व्यवस्था .तसेच मोफत औषधे वितरित करण्यात आली.शिबिराच्या यशस्वीतेसाठी दृष्टी लॉयन्स नेत्रालय परतुरचे संचालक, कर्मचारी,लॉयन्स क्लब ऑफ परतुरचे पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.
सिमेंट रस्ता उपलब्ध करून देणार: लोणीकर
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहुल लोणीकर , मनसेचे माजी आमदार बाविस्कर, जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांच्यासह मान्यवरांनी शिबिरास भेट दिली.मुख्य रस्त्यापासून ते नेत्रालयापर्यंत सिमेंट रस्ता उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राहुल लोणीकर यांनी याप्रसंगी दिली.
_________________________