जालनाः श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवारी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच मोठी गर्दी केली होती. हर हर महादेवच्या गजराने शिवालये दुमदुमून गेली होती.
शहरातील पाणीवेश येथील पंचमुखी महादेव, मुक्तेश्वर, नंदि मंदिर, इच्छेश्वर, खोलेश्वर, थाडेश्वर महादेव मंदिर, ढवळेश्वर महादेव, कुरूंदेश्वर, खडकेश्वर, अमृतेश्वर आदी विविध मंदिरांमध्ये श्रावणी सोमवार निमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून दुग्धाभिषेक, कावड यात्रांमधून आणलेल्या गंगा जलाने अभिषेक करण्यात आला. तर जिल्ह्यातील नांगरतास, शंभू महादेव, विज्ञानेश्वर, वटेश्वर, रामेश्वर आदी मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारचा उत्साह दिसून आला. विविध सेवाभावी संस्था तसेच मंडळांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. श्रावण सोमवारनिमित्त बिल्वपत्राची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.