वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. मात्र, या ज्योतिर्लिंगाचे वास्तविक स्थान झारखंडमधील देवघर की महाराष्ट्रातील परळी वैजनाथ, याबाबत दीर्घकाळापासून मतभेद आहेत. शिवपुराणातील उल्लेख, धार्मिक परंपरा, प्राचीन कथा आणि दोन्ही ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व यामुळे हा विषय अधिकच रोचक बनतो. झारखंडमधील देवघरला उत्तर भारतात वैद्यनाथ धाम म्हणून विशेष मान्यता आहे, तर महाराष्ट्रात परळी वैजनाथ हेच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असल्याची दृढ श्रद्धा आहे. या दोन्ही श्रद्धास्थानांची वैशिष्ट्ये, पौराणिक संदर्भ आणि धार्मिक मान्यता जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
▪️प्रश्न - वैद्यनाथ ज्योतिर्लिंगला कसे जावे?
-विमान प्रवासाने गेले तर देवघर येथे विमानतळ असून, तेथे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग धाम फक्त 7 ते 8 कि. मी. आहे रेल्वेने गेले तर ‘जसीडीह’ रेल्वेस्टेशनपासून धामचे अंतर 7 कि. मी आहे. रस्ता मार्गाने जायचा विचार केल्यास देवघरपर्यंत एकदम चांगले रस्ते असून अनेक दर्शनार्थी दर्शनाला जातात. 2026 च्या जुलै–ऑगस्टच्या श्रावण महिन्यात दररोज 1 ते 1.50 लाख भाविक दर्शन घेतात.
▪️प्रश्न – वैद्यनाथ ज्योतिर्लिंग धामची प्राकट्य कथा काय आहे?
-राक्षसराज रावणाशी संबंधित ही कथा असून रावणाने कैलास पर्वतावर तपस्या सुरू केली. महादेव प्रसन्न न झाल्यामुळे त्यांनी इतकी कठोर तपस्या हिमालयवर सुरू केली तरी महादेव प्रसन्न झाले नाही. नंतर शेवटची पूजा रावणाने आपले मस्तक कापून सुरू केली. 9 मस्तक कापल्यानंतर महादेव प्रसन्न झाले. रावणाने महादेवांना लंकेत चालण्याचा मागितला. महादेव अडचणीत आले. परंतु, त्यांनी वर देतांना संगीतले की, या लिंगला घेऊन जा. परंतु, पृथ्वीवर कुठे ठेवल्यास हे तिथेच स्थापित होईल. महादेवांना जायची इच्छा नव्हती. वाटेत रावणास लघुशंका आल्याने ग्वालाचे रूप घेतलेल्या रूप घेऊन आलेल्या विष्णूंच्या हातात लिंग देऊन लघुशंकेसाठी गेला. त्या ग्वालाने ते ज्योतिर्लिंग तेथे पृथ्वीवर ठेवल्याने तेथेच त्याची स्थापना झाली. म्हणून त्यास "रावणेश्वर धाम" असेही नाव आजही दिसते.
▪️प्रश्न - कांवरीया काय आहे?
-आजही तेथे लाखो कांवरीया सुलतानगंजहून किंवा बिहारहून पाणी भरलेले कावड घेऊन अनवाणी दर्शनाला येतात. त्यास कांवडीया म्हणतात. हे अंतर 112 कि. मी. आहे आणि ही प्रथा रावणाने त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून केल्याचे मानले जाते.
▪️प्रश्न–‘वासुकीनाथ’ काय आहे?
-या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतल्यानंतर 42 कि. मी. असलेल्या वासुकीनाथचे दर्शन घेतल्याशिवाय हे दर्शन पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. यास ‘मनोकामना लिंग’ असेही मानतात.
▪️प्रश्न - वैद्यनाथांचे दर्शन कसे घ्यावे?
-श्रावणात दररोज एक ते दीड लाख भक्त तथा कांवारिया दर्शनासाठी येतात. अशात तेथे 6000/ रुपयाचे दर्शन तिकट घेऊन पंडाची मदत घेतल्यास ताबडतोब दर्शन घेऊ शकतात; अन्यथा तासनतास दर्शनासाठी लागतात. तेथे राहण्यासाठी हॉटेल, धर्मशाळा अशी चांगली व्यवस्था आहे.
▪️प्रश्न - वास्तविक ज्योतिर्लिंग झारखंडचे वैद्यनाथ की परळीचे वैद्यनाथ?
-गीताप्रेस गोरखपुर यांनी काढलेल्या माहितीनुसार झारखंडचे वैद्यनाथ वास्तविक ज्योतिर्लिंग आहे, असे नमुद केले आहे. श्री शिवपुराननुसार याच भूमीवर सतीचे हृदय पडले. येथेच महादेवाने सतीच्या ‘ह्रत्पिण्ड’ चे दाह संस्कार केल्यामुळे ‘चिताभूमि’ असे नाव पडले; जे झारखंडमधील देवघर येथेच आहे. आजही तेथे दररोज किमान एक अग्नी संस्कार होतो. कधीच खाडा पडत नसल्याचे संगीतले जाते. महाराष्ट्रात ‘परळी वैजनाथच’ या श्लोकानुसार बीड जिल्ह्यातील परळीला मानतात. हे मंदीरपण अत्यंत जुने असून त्याचा जर्णोद्वार रानी अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. यामुळे महाराष्ट्राचे लोक ‘परळी’ ला वैजनाथ ज्योतिर्लिंग मानतात तर उत्तरेत मात्र झारखंड येथील देवघरला वास्तविक ज्योतिर्लिंग मानतात. माझ्या मते दोन्ही देवांचेच स्थान असल्यामुळे दोन्हीचे दर्शन एकदातरी भक्तांनी अवश्य करावे.
▪️प्रश्न - झारखंड वैद्यनाथ ज्योतिर्लिंगचे विशेष काय आहे?
१. प्रत्येक जागी मंदिरावर महादेवांचे त्रिशूल असते तर झारखंडमधील महादेवांच्या मंदिरावर ‘पंचशूल’ आहे ते खालूनही स्पष्ट दिसतात.
२. येथे महादेवाच्या मंदिराच्या कळसापासून पार्वतीच्या मंदिराच्या कळसापर्यंत ‘गठबंधन’ लांब मोळी (पवित्र लाल रंगाचा लाल धागा) आपल्या हाताने तेथील पंडे बांधतात. यामुळे आपसात पती-पत्नीचे प्रेम अखंड राहून मनोकामना पूर्ण होते, अशी मान्यता आहे. यामुळेच यास ‘मनोकामना लिंग’ असे ही म्हणतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा दर्शनास येतात.
३. यास दुनियेतला सर्वात लांब मेला असे म्हणतात. कारण सुलतानगंजपासून वैद्यनाथ पर्यंत पाई पाण्याची कावड घेऊन कावडीया येतात. हे अंतर ११२ कि. मी. आहे. कावडीयामध्ये सर्व प्रकारचे लोक भाग घेतात. त्यात शिक्षित आणि न्यायाधीश भविकांचा पण समावेश आहे.
४. हे शिवलिंग रावणद्वारा स्थापित असून आजही मंदिर समोर ‘रावनेश्वर धाम’ असे नाव वाचायला मिळते. (सोबतच्या छायाचित्रात बघा)
५. येथे श्रावण महिन्यात १ कोटीच्या वर कावड चढवल्या जातात, जे दृश्य विलोभनीय असून, संसारातले असे हे पहिलेच आणि एकमेव मंदिर असल्याचे बोलले जाते.
६. या मंदिराचा कळस सोन्याचा असून, शिखरावर ‘चंद्रकांत मणी’ लागलेला असून. हा मणी विश्वकर्माद्वारा निर्मित मानला जातो.
७. या मंदिरात 10 हजार पंडे कार्यरत आहेत. तरी भाविकांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी श्रावण महिन्यात शक्य झाल्यास सोमवारी झारखंड येथील हा नजरा बघून आपले डोळे सार्थक आणि मन तृप्त करावे.
♦️सीए गोविंदप्रसाद मुंदडा
जालना, मो.9422218428
===============