मुलाखत- सीए गोविंदप्रसाद मुंदडा जालना
चित्रपटसृष्टी म्हणजे केवळ ग्लॅमर, प्रसिद्धी आणि झगमगाट नव्हे. त्यामागे असते ती अथक मेहनत, जिद्द, कौशल्य आणि आपल्या ध्येयावर असलेली अढळ निष्ठा. वारसा ने मिळवलेला प्रवास करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्दर्शक दिलीप गुलाटी यांचा प्रवासही असाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीचा, अनुभवांचा वेध घेणारी ही विशेष मुलाखत.
प्रश्न : सर्वप्रथम आपल्या चित्रपट क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगा.
दिलीप गुलाटी : माझे वडील डी. डी. गुलाटी हे चित्रपट क्षेत्रात फायनान्स ब्रोकर म्हणून कार्यरत होते. लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीतील लोकांचे आमच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे या क्षेत्राबद्दल मला लहानपणापासूनच आकर्षण वाटू लागले. कॉलेजमध्ये फर्स्ट इयर सायन्सला असतानाच मला जाणवले की, आपण चित्रपट दिग्दर्शक व्हायचे. तिथूनच माझा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
प्रश्न : सुरुवातीला आपण कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले?
दिलीप गुलाटी : मी सर्वप्रथम हिंदी चित्रपट, 'मजबूत' ‘दिग्दर्शित केला. त्यात मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही, मात्र त्यानंतरही मी हिंमत हरलो नाही. पुढे ‘जान लडा देंगे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात हेमंत बिरजे, पुनीत इस्सार, गुलशन ग्रोवर आणि सदाशिव अमरापूरकर यांसारखे कलाकार होते. त्यानंतर ‘सिल्वर जुबली’ हा चित्रपट केला. मी मागे वळून पाहिले नाही; आजवर हा प्रवास सुरूच आहे.
प्रश्न : आजवर आपण किती चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे?
दिलीप गुलाटी : आजवर मी सुमारे 78 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये हिंदी50, गुजराती14 आणि भोजपुरी14 चित्रपटांचा समावेश आहे. तसेच एका मराठी चित्रपटासाठी मी लाईन प्रोड्युसर म्हणूनही काम केले आहे.
प्रश्न : आपल्या गाजलेल्या काही मराठी आणि हिंदी चित्रपटांची नावे सांगाल का?
दिलीप गुलाटी : मराठीमध्ये ‘फोर इडियट्स’ हा चित्रपट चांगला चालला. हिंदीमध्ये ‘न्याय द जस्टिस’, ‘जान लडl देंगे’ (सिल्वर जुबली), जंगल ब्यूटी’, शहीदे कारगिल आणि धर्मेंद्र यांची भूमिका असलेला ‘द रिवेंज – गीता मेरा नाम’ हl चित्रपट चांगला चालला.
प्रश्न : चित्रपट क्षेत्राबद्दल आजच्या नव्या पिढीला आपला काय संदेश आहे?
दिलीप गुलाटी : या क्षेत्रात केवळ ग्लॅमरच्या आकर्षणापोटी येऊ नका. जर तुमची या क्षेत्रात खरोखर कला,आवड आणि जिद्द असेल, तरच या क्षेत्रात यश मिळेल. मात्र केवळ ग्लॅमर, पार्टी आणि हिरो-हिरोईनच्या मागे लागून या क्षेत्रात येणाऱ्यांना फार काळ टिकता येत नाही. व्यसन, ड्रग्ज आणि हुक्का मुला, मुली यांसारख्या गोष्टींपासून दूर राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वरील गोष्टीच्या नादी लागल्यास तुम्ही कधीही कामयाब होणार नाही, हे निश्चित.
प्रश्न : आपल्या कुटुंबाबद्दल सांगा. या क्षेत्रात आपल्या मुलीचीही आवड आहे का?
दिलीप गुलाटी : मला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. माझी मोठी मुलगी सुरुवातीला या क्षेत्रात येण्यास इच्छुक होती. मात्र, नंतर तिने विचार बदलले कारण तिला भारताबाहेर जायचे होते. बाकी मुलांना या लाईन मध्ये इंटरेस्ट नव्हता. परंतु माझी पत्नी श्रीमती कोमल गुलाटी असून सध्या ती प्रोडक्शन डिझायनिंग, कॉस्ट्यूम आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहे.
प्रश्न : सलमान खान आणि तुमच्या घरातील संबंधांबद्दल बोलले जाते, ते कितपत खरे आहे?
दिलीप गुलाटी : होय. माझे वडील चित्रपट निर्मिती करत होते त्यामध्ये सलमान खानचे वडील सलीम जावेद हे रायटर होते त्यामुळे मी त्यांच्या घरी जायचो आणि आजपर्यंत आमचे तसेच घरेलू संबंध आहे.
प्रश्न... सध्या आपले कोणते प्रोजेक्ट चालू आहे. ?
दिलीप गुलाटी : हिंदी चित्रपट “मिस कॅरेज ऑफ जस्टीस”(Miscarriage of Justice) हे पूर्ण झाले असून त्यात किरण कुमार, उपासना सिंग, मुग्धा गोडसे, सुजाता मेहता, हेमंत बिर्जे, इत्यादी कलाकार असून तुम्ही पण प्रेस रिपोर्टर म्हणून काम केले आहे.
प्रश्न : सध्या आपल्या कोणत्या चित्रपटांचे काम सुरू आहे?
दिलीप गुलाटी : सध्या माझ्या दोन चित्रपट. त्यापैकी एक क्रेझीफॅमिली’ आणि दुसरा ‘लव इन दुबई, आहे. याशिवाय एका भोजपुरी चित्रपट ‘रामायण’चेही काम चालू आहे. माझे बहुतांश चित्रपट आतापर्यंत ऑल इंडिया लेव्हलवर प्रदर्शित झाले आहेत. तसेच जालना सह मराठवाड्यातही आणि संपूर्ण महाराष्ट्रा सह भारतात रिलीज होणार आहे
प्रश्न : डुप्लिकेट कलाकारांना घेऊन आपण चित्रपट बनवला होता. त्याबद्दल काय सांगाल?
दिलीप गुलाटी : मी पहिल्यांदा डुप्लिकेट हिरोना चान्स देऊन ‘गंगाधर की गीता’ हा चित्रपट बनवला होता. यात देव आनंद, धर्मेंद्र, जॅकी श्रॉफ, गोविंदा आणि सलमान खान यांच्या तब्बल १६ डुप्लिकेट कलाकारांना संधी दिली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले.
प्रश्न : शेवटी आपल्या वाचकांसाठी काय संदेश द्याल? चित्रपट क्षेत्राबद्दल आजच्या नव्या पिढीला आपला काय संदेश आहे ?
दिलीप गुलाटी : ‘जिंदगी में जोकर बन जाओ, मतलब जो -कर ,अच्छा कर. याच्यात सर्व आल. या क्षेत्रात केवळ ग्लॅमरच्या आकर्षणापोटी येऊ नका. जर तुमची या क्षेत्रात खरोखर कला,आवड आणि जिद्द असेल, तरच या क्षेत्रात यश मिळेल. मात्र केवळ ग्लॅमर, पार्टी आणि हिरो-हिरोईनच्या मागे लागून या क्षेत्रात येणाऱ्यांना फार काळ टिकता येत नाही. व्यसन, ड्रग्ज, हुक्का, मुला आणि मुली यांसारख्या गोष्टींपासून दूर राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वरील गोष्टीच्या नादी लागल्यास तुम्ही कधीही कामयाब होणार नाही, हे निश्चित.