सी.टी.एम.के. गुजराती विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात

Jalna Nayak    04-Aug-2026
Total Views |
जालना : सी.टी.एम.के. गुजराती विद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक सतिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका विद्या करवंदे व शिक्षक ओमप्रकाश कावळे होते.यावेळी आर.पी.कायंदे व व्यवहारे यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करत त्यांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कार्यक्रमानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सुमारे ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या 'माझी मैना गावावर राहिली' या लावणीचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.