१६ लाख ४० हजार रुपये किमतीची ४१ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

सेवली पोलिस व अंमली पदार्थ विरोधी पथकाची संयुक्त कारवाई

Jalna Nayak    12-Oct-2026
Total Views |
 
जालन्यात गांजाच्या लागवडीवर पोलिसांचा छापा!
 
जालना- जालना जिल्ह्यात अवैध गांजा लागवडीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १६ लाख ४० हजार रुपये किमतीची ४१ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. ही कारवाई शेवली पोलिस ठाणे आणि अंमली पदार्थ विरोधी पथक, जालना यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवली परिसरातील एका शेतात गांजाची झाडे लावून त्याची लागवड केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून गांजाची झाडे जप्त केली.
या प्रकरणी दिनकर दत्तात्रय वैद्य (वय ५०, रा. वैद्यवडगाव, ता. मंठा, जि. जालना) याच्याविरुद्ध शेवली पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६६/२०२६, कलम २०(ब) (ii)(क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ४१ किलो गांजाची झाडे, अंदाजे १६ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एम. शेख, सहाय्यक फौजदार मारुती शिवरकर, विनोद गडदे, महिंद्र सोनवणे, संतोष चव्हाण, प्रल्हाद चिरफरे, सुनील जाधव, पांडुरंग निंबाळकर, अशोक डोईफोडे, शुभम बडोगे यांनी केली. कारवाईत सेवली पोलिस ठाणे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.