आधुनिक शेतीला नवी ताकद; जालन्यात ‘ऋषीकृपा ट्रॅक्टर्स’चा दिमाखात शुभारंभ

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन; मॅसी फर्ग्युसनच्या अत्याधुनिक ट्रॅक्टर व कृषी यंत्रसामग्रीची सुविधा उपलब्ध

Jalna Nayak    12-Oct-2026
Total Views |

न्यू मोंढा, जालना येथे ऋषीकृपा ट्रॅक्टर्सच्या शोरूमचे उद्घाटन करताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, सुभाषराव बोडखे व उपस्थित मान्यवर. 
  
जालना | प्रतिनिधी
जालना शहरातील न्यू मोंढा परिसरात ‘ऋषीकृपा ट्रॅक्टर्स’ या मॅसी फर्ग्युसनच्या अधिकृत डीलरशिपचा सोमवारी (१२ ऑक्टोबर) दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन झाले. या नव्या व्यवसायाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि विश्वासार्ह कृषी यंत्रसामग्री एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून मान्यवरांनी ऋषीकृपा ट्रॅक्टर्सचे प्रमुख  सुभाषराव बोडखे यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या नव्या व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेतीच्या बदलत्या गरजा, वाढता मजुरीचा खर्च आणि कमी वेळेत अधिक उत्पादन घेण्याची गरज लक्षात घेता आधुनिक कृषी यंत्रसामग्रीला दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यात सुरू झालेली ऋषीकृपा ट्रॅक्टर्सची डीलरशिप शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास शिवसेना नेते भास्कर आंबेकर, संजय खोतकर, विजय अण्णा बोराडे, महापौर वंदना मगरे, राजेश राऊत, बबलू चौधरी, संतोष महाराज आढावणे, भाऊसाहेब घुगे, संध्याताई देठे, गजानन गीते, भागवत बावणे, भानुदास घुगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यावसायिक आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. 
 

न्यू मोंढा, जालना येथे ऋषीकृपा ट्रॅक्टर्सच्या शोरूमचे उद्घाटन करताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, सुभाषराव बोडखे व उपस्थित मान्यवर. 
 
ट्रॅक्टरपासून सर्व्हिसपर्यंत सुविधा
ऋषीकृपा ट्रॅक्टर्सकडून मॅसी फर्ग्युसनच्या विविध श्रेणीतील ट्रॅक्टर्स तसेच कृषी उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विविध प्रकारची शेती, फळबागा, द्राक्षबागा तसेच अवजड कृषी कामांसाठी आवश्यकतेनुसार ट्रॅक्टरची निवड करण्यासाठी ग्राहकांना मार्गदर्शन मिळणार आहे.याशिवाय अस्सल सुटे भाग, तज्ज्ञ सर्व्हिसिंग, देखभाल सुविधा आणि ग्राहकांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर डीलरशिपचा भर राहणार आहे. त्यामुळे ट्रॅक्टर खरेदीपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांना विक्रीनंतरची सेवा देण्याचेही उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
इंधन कार्यक्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर
मॅसी फर्ग्युसनच्या ट्रॅक्टर्समध्ये विविध शेतीच्या कामांसाठी आवश्यक शक्ती, कार्यक्षमता आणि इंधन बचतीचा समतोल साधण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या आकारमानानुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार योग्य ट्रॅक्टर निवडण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धात्मक किंमत, उपलब्ध वित्तपुरवठा पर्याय आणि ग्राहक सेवा यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी व कृषी-व्यवसायिकांसाठी ऋषीकृपा ट्रॅक्टर्स एक उपयुक्त पर्याय ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.