जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या मंठा चौफुली ते नाव्हा रस्त्याची तात्काळ डागडुजी करा
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश
Jalna Nayak 13-Oct-2026
Total Views |
जालना: मंठा चौफुली ते न्हावा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना व वाहनचालकांना खड्ड्यांमुळे तीव्र अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष स्थिती पाहिली असता, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. नागरिकांची सुरक्षितता आणि सुरळीत वाहतूक लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देश दिले. दुरुस्तीचे काम दर्जेदार असावे आणि ते विहित वेळेत पूर्ण व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोल्हे , प्रादेशिक परिवहन अधिकारी दौंड , महानगरपालिकेचे अभियंता, पोलीस विभागाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.