अंबडला श्रीमत्स्योदरी देवीच्या दर्शनाला सातव्या माळेला उलटला जनसागर

लाखो भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन

Jalna Nayak    17-Oct-2026
Total Views |

लाखो भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन
 
अंबड - मराठवाड्याच्या आराध्य दैवत असणाऱ्या श्रीमत्स्योदरी देवीच्या दर्शनाला आज दि. १७ रोजी सातव्या माळेला भल्या पहाटे पासून भाविकांची मंदिराच्या रांगेत तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी भाविक भक्तांची लाखोंच्या संख्येने आलोट गर्दी झाल्याचे दिसून येत होते.
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि कोकणातील बहुसंख्य भाविक भक्त प्रत्येक वर्षी श्रीमत्स्योदरी देवीच्या दर्शनासाठी येतात. तसेच आपली इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी बोललेला आपला नवस फेडण्यासाठी देखील श्री मत्स्योदरी देवीला येतात. या ठिकाणी ७ वी माळेला प्रत्येक पायरीला नारळ फोडणे, मुलांना झोळीत फेकण्याचा नवस,भक्तांना नारळ,गुळ,साखर फुटाणे,पेढे वाटण्यासाठी अनेक भक्तगण पुढे सरसावले असतात. अंबड नगरीत श्रीमत्स्योदरी देवीच्या मनोभावे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात.
अंबड तालुक्यातील जवळ पास असणारे वरगाव, पावसेपांगरी, झिरपी, शिरनेर, पारनेर, लालवाडी, भालगाव, ताडहादगाव, धनगरपिंपरी, शेवगा, हारतखेडा, सारंगपूर, बोरी, मसई, वलखेडा, पांगरखेडा, शिराढोन यांसह तालुक्यातील इतर गांवातील बहुसंख्य भाविक भक्त सकाळच्या प्रहरी पायी वारी करत ७ व्या माळेला दर्शन घेतात.श्री मत्स्योदरी संस्थान तसेच आयटीआय च्या वतीने मंदिर परिसरात भाविकांची गर्दी रोखण्यासाठी तसेच शिस्तबद्ध रांगा लावण्याचे नियोजन करण्यात येते. अंबड पोलीस व आरसीएफच्या जवानांनी यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.काही अनुचित प्रकार तसेच चोऱ्या होऊ नये म्हणून सिसिटीव्ही देखील संस्थानच्या वतीने लावण्यात आले आहेत. तहसीलदार सोमेश मोहिते तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी धुमाळ व पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या वतीने वेळोवेळी मंदिर व्यवस्थापनाची तसेच बंदोबस्ताची पाहणी करण्यात येते.
 
 
 देवीचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी मनोभावे दर्शन घेतले.
 
 
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सातव्या माळेला मराठवाड्यातील श्रद्धास्थान व अंबड-घनसावंगी तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री क्षेत्र मत्स्योदरी देवीचे सपत्नीक आरती करून देवीचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी मनोभावे दर्शन घेतले. आणी श्री मत्स्योदरीच्या चरणी राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, शेतकरी बांधवांना या संकटातून बाहेर पडण्याचे बळ मिळू दे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुख, समृद्धी, समाधान व आनंद नांदो, असे साकडे माजी मंत्री राजेश टोपे यांनी घातले. त्यानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.