शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीला गती मिळणार- खा. काळे

शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचा मान्यवरांच्या उपस्थित शुभारंभ

Jalna Nayak    22-Oct-2026
Total Views |
 
 
जालनाः शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य नागरिक व शेतकरी तसेच इतर गरजूंच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावून सामान्यांचे जीवनमान उंचावेल असा विश्वास खा.कल्याण काळे यांनी व्यक्त केला. जालना शहरातील नवीन मोंढा भागात शिवशक्ती नागरी पतसंस्थेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. युवा नेते तसेच उद्योजक अक्षय विष्णू पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. पतसंस्थेच्या माध्यमातून अर्थक्रांती करण्याचा तसेच सामान्यांना आपली  वाटणारी संस्था म्हणून असे आपण काम करणार असल्याचे मत अक्षय पवार यांनी व्यक्त केले.
येथील 'शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.' च्या मुख्य शाखेचा उद्घाटन सोहळा बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पवार कॉम्प्लेक्स, कृषी उत्पन्न बाजार समिती, नवीन मोंढा, जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांचे शुभाशीर्वाद लाभले. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. कल्याणराव काळे,यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नारायणराव कुचे आणि माजी आमदार राजेश टोपे उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील राजकीय आणि सामाजिक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये आमदार बबनराव लोणीकर (परतूर), आमदार संतोष दानवे (भोकरदन), आमदार हिकमत उदाण (घनसावंगी), माजी आमदार अरविंदराव चव्हाण (बदनापूर), माजी आमदार कैलास गोरंट्याल (जालना), माजी आमदार संतोष सांबरे (बदनापूर), आमदार राजेश राठोड (विधानपरिषद) आणि माजी आमदार विलास खरात (अंबड) यांचा समावेश होता. याशिवाय सोहळ्यास मुख्य पाहुणे म्हणून भास्करराव दानवे (महानगर जिल्हाध्यक्ष भाजप), भास्करराव आंबेकर (जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना), वंदनाताई मगरे (महापौर जालना), अनिरुद्ध खोतकर (माजी जि.प. अध्यक्ष), कल्याणराव दळे (जिल्हाध्यक्ष काँग्रेस), राजाभाऊ देशमुख (माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस), ए. जे. बोराडे (जिल्हाप्रमुख शिवसेना), भाऊसाहेब घुगे (जिल्हाप्रमुख जालना), राजेश राऊत (उपमहापौर जालना), पंडितराव भुतेकर (माजी जि.प. अध्यक्ष जालना), कपील आकात (युवा जिल्हाध्यक्ष रा.कॉ.पा. शरद पवार) आणि बबलू चौधरी (माजी नगराध्यक्ष) मोतीराम अग्रवाल बँकेचे माजी अध्यक्ष अंकुशराव राऊत, मनसेचे जिल्हाध्यक्ष रावी राऊत  आदी मान्यवर उपस्थित होते. पतसंस्थेचे अध्यक्ष अक्षय विष्णु पवार आणि मेडीकल असोसिएशन जालनाचे अध्यक्ष साईनाथ दादा पवार यांच्यासह पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम आर्थिक सेवा पुरवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या सोहळ्यास जालना शहर व परिसरातील नागरिक, व्यापारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.