परतूर, प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील रायगव्हाण येथे मोगल्याच्या झाडाच्या गोडंब्या खाल्ल्यामुळे सात शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांचे वय ७ ते ८ वर्षे असून, त्यांना उलट्या, मळमळ आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्रास सुरू झाल्यानंतर सातही विद्यार्थ्यांना प्रथम आष्टी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार सर्व सात विद्यार्थ्यांना उपचारासाठी जालन्याकडे हलविण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी तातडीने दखल घेत जालना येथील सिव्हिल सर्जन डॉ. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. विद्यार्थ्यांना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, याबाबत त्यांनी चर्चा केली. अशा एकूण सात विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, त्यांच्यावर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.