जेष्ठ नागरिकांनी किंवा संभावित रुग्णांनी नियमित आरोग्य तपासणी हाच प्रतिबंध - डॉ.जयश्री भुसारे

जागतिक पक्षघात दिन - २९ ऑक्टोंबर

Jalna Nayak    29-Oct-2026
Total Views |

प्रतिबंध बाबत जनजागृती माहिती असणे अत्यावश्यक आहे.
 
दरवर्षी २९ ऑक्टोंबर रोजी जागतिक पक्षघात दिन साजरा करण्यांत येतो. याला आपण इंग्रजीमध्ये स्ट्रोक शब्द सामान्यपणे वापरला जातो. वयाच्या ६० वर्षानंतर पक्षघात होण्याची शक्यता असते. परंतु आता २५ ते ५० वर्षे वयोगटातील लोकांना पक्षघात (स्ट्रोक) होत आहे. यावर मात करण्यासाठी त्याची कारणे, प्रतिबंध बाबत जनजागृती माहिती असणे अत्यावश्यक आहे.
स्ट्रोक (पक्षघात) म्हणजे काय- आपल्या शरीरातील मेंदुला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेंदुच्या ऊतींना ऑक्सीजन व पोषकतत्व मिळत नाहीत. त्यामुळे स्ट्रोक होण्याचा धोका असतो. लक्षणे :- लकवा येणे, तोंड वाकडे होणे, बोलतांना बोबडी वळणे, एका बाजुच्या हातापायाची ताकद कमी होणे, चालतांना तोल जाणे, झटके येणे.
रोगनिदान चाचण्या :- लिपीड प्रोफाईल, सीटी स्कॅन, ऑंजिओग्राफी, एम.आर.आय, २ डी इको इ.तपासणीद्वारे रोगनिदान करण्यांत येते. धोके :- अंपगत्व येते, मृत्यू होण्याचा धोका असतो.
 
संभावित रुग्ण :- उच्च रक्तदाब, हदयविकार, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन, बी १२ जीवनसत्व कमी, हदयाच्या झडपांचे विकार.
 
प्रतिबंध :-उच्च रक्तदाब, मधुमेह यावर नियंत्रण करणे आवश्यक आहे. दररोज व्यायाम, योगा करणे. स्ट्रोक आल्यानंतर न्युरोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट कार्डिओलॉजिस्ट यांच्या देखरेखाली २४ तासांच्या आंत औषधोपचार घेणे. हे अत्यंत महत्वाचे आहे कारण याला गोल्डन अवर असे म्हणतात. यामध्ये रुग्ण रिकव्हर होऊ शकतो. यातुन सुखरुप बाहेर पडल्यानंतर रुग्णांमधील हातापायाची ताकद हळुहळू ६ महिने पर्यंत फिजिओथेरपीचे अत्यंत महत्वाचे कार्य आहे. ब्रेन स्ट्र् ोक टाळण्यासाठी धुम्रपान, अल्कोहोलचे सेवन टाळणे, निरोगी जीवनशैली राखणे, आहारातील मांस व मिठाईचे मर्यादित प्रमाण असणे, नियमित आरोग्य तपासणी.
(डॉ. जयश्री भुसारे) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना.