जालनाः मयूर छेडा आणि कल्पेश सावला या दोघांनी 1998 मध्ये मुंबईमध्ये अत्यंत छोट्या स्तरावर झुप ब्रँड या तयार कपड्यांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला होता. युवक तसेच मध्यम आणि ज्येष्ठांसाठी नेमके दर्जेदार आणि आकर्षक डिझाईनचे तयार कपडे करण्याचा हा उद्योग अत्यंत संघर्षातून आज मोठा झाला आहे. झुप ब्रँडची आता दुसरी पिढी या व्यवसायात दाखल झाली आहे. त्यामुळे आजच्या काळातील युवकांची अर्थात झेनजींची तसेच मध्यम वयातील पुरूषांची कपड्यांची मागणी आणि फॅशनचा ेंड लक्षात घेऊन आम्ही दर्जेदार तयार कपडे सादर करतो. जे की ग्राहकांची मोठी पसंतीस उतरतात, अशी प्रतिक्रिया झुप या प्रसिद्ध ब्रँडचे संचालक भव्य सावला यांनी दै. जालना नायकशी संवाद साधताना व्यक्त केली. झुप या लक्सरिअस ब्रँडच्या विविध कपड्यांना युवकांमधून चांगलीच मागणी असल्याचे झुपच्या संचालकांनी सांगितले.
जालना येथील हॉटेल सिद्धार्थ द फर्न येथे मुंबई येथील झुप ब्रँडच्या वतीने म्प शोचे आयोजन अर्थात तयार कपड्याचे प्रदर्शन आणि ते देखील कापडासह भरविले आहे. हॉटेल फर्नच्या तिसऱ्या मजल्यावर हे प्रदर्शन असून आठ ते दहा ऑक्टोबर या कालावधीत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. दुपारी बारा ते रात्री नऊपर्यंत याची वेळ आहे. दरम्यान, शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी या प्रदर्शनाला जालनेकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. येथूनच आजच्या युवा पिढीतील ेंड लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या मागणीनुसार आणि आवडीनुसार डिझाईन तयार करून कापडे शिवून देतो विशेष म्हणजे वेगवेगळ्या दर्जेदार कापड मिल्सचे कापड येथे उपलब्ध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कुर्ता सेट, शेरवानी वेडिंग वेअर, कॅज्यूअल अँड पार्टी वेअर, एक्स्लुझिव्ह कलेक्शन तसेच प्रीमिअम सुटस्, फॉरमल पँट शर्ट येथे उपलब्ध आहेत.
या तयार कपड्यांची सुरूवात 6 हजार 450 रूपयापासून सुरू होते असेही भव्य सावला यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई नंतर आम्ही प्रथमच जालन्यात हे झुप ब्रँडचे वस्त्र प्रदर्शन लावले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मुंबई प्रमाणेच इतर शहरांमध्येही अनेक नागरिक दर्जेदार तयार कपडे खरेदीसाठी उत्सुक असल्याचे यावेळी आम्हाला येथे जाणवले. आजच्या पिढीला हवी तशी डिझाईन आम्ही ऑन डिमांड तयार करून देत असल्याचे सावला यांनी सांगितले. जालनेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहनही भव्य सावला यांनी केले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जालना येथील जनसेवा ग्रुपचे पदाधिकारी सुदेश करवा आणि सुनील बजाज यांनी या प्रदर्शनास भेट देऊन त्यांचे वर्ग मित्र असलेले मयूर छेडा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जालना येथील माजी नगरसेवक आणि प्रसिद्ध उद्योजक राजेश सोनी यांच्यासह अन्य मान्यवरांनी देखील झुपच्या प्रदर्शनास भेट देऊन कपड्यांची खरेदी केली.