जालना: नवरात्र महोत्सवानिमित्त ज्वाला लॉन्स येथे दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान आद्विक क्लबच्या वतीने ‘रुबऱू रास दांडिया’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांना चित्रकूट निवास येथे देण्यात आले.
यावेळी आद्विक क्लबच्या सदस्यांनी भास्कर दानवे यांना सीड पेपरपासून तयार केलेली पर्यावरणपूरक निमंत्रण पत्रिका दिली. विशेष म्हणजे, या कागदामध्ये विविध प्रकारच्या बियांचा समावेश असून, वापरानंतर हा कागद मातीत टाकून त्यावर पाणी दिल्यास त्यापासून रोपटे उगवू शकते. या अभिनव संकल्पनेचे भास्कर दानवे यांनी कौतुक केले. “उत्सवाच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे ही अत्यंत चांगली संकल्पना आहे. आद्विक क्लबने सीड पेपरच्या माध्यमातून जालनेकरांना दिलेला पर्यावरणपूरक संदेश निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी सांगितले.यावेळी या उपक्रमाचा प्रत्यक्ष प्रयोग म्हणून चित्रकूट निवास येथे सीड पेपर कुंडीतील मातीत दाबून त्यावर पाणी टाकण्यात आले. ‘उत्सव साजरा करूया आणि पर्यावरणही जपूया’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.आद्विक क्लबच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे भास्कर दानवे यांनी मनापासून कौतुक करून ‘रुबऱू रास दांडिया’च्या आयोजनासाठी क्लबच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आद्विक क्लबचे सदस्य प्रणय बागडी, संस्कार जैस्वाल, अभिषेक मुंदडा, भाजपा सरचिटणीस वसंत शिंदे, भाजपा जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, निवृत्ती गायकवाड, राजेश जोशी, बद्रीनाथ वाघ, शरद आमले आदी उपस्थित होते.