जालना शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न करणार – महापौर वंदना मगरे

महावीर ढाक्का व विक्रांत ढाक्का यांच्यावतीने दिव्यांग महिला, तृतीयपंथी आणि महानगरपालिका महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप

Jalna Nayak    10-Nov-2026
Total Views |

साडीचे वाटप करण्यात आले
 
जालना | प्रतिनिधी
जालना शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असून शहरातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. तसेच जालना महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे यांनी दिली. दिवाळीच्या निमित्ताने नगरसेवक महावीर ढाक्का व नगरसेवक विक्रांत ढाक्का यांच्या वतीने दिव्यांग महिला, तृतीयपंथी तसेच महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना साडीचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमातून दिवाळीचा आनंद सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी नगरसेवक महावीर ढाक्का म्हणाले की, प्रभाग क्रमांक ९ मध्ये अनेक मंदिरांचा विकास आणि विविध विकासकामे करण्यात आली आहेत. प्रभागातील उर्वरित विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी महानगरपालिका स्तरावर दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागण्यांची दखल घेत महानगरपालिकेत ठराव करून घेण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीत दर पाच वर्षांनी विकासकामांच्या जोरावर आपल्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न असतो. प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासकामे शिकायची असतील तर ढाक्का यांच्याकडून शिका!
जालना शहरातील विकासकामे कशी करावीत, हे नगरसेवक महावीर ढाक्का यांच्याकडून शिकावे, अशा शब्दांत यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला धीरज ढाक्का, रणवीर ढाक्का, भीम ढाक्का, करण ढाक्का यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीनिमित्त आयोजित या साडी वाटप उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.