आयुक्त संजय काटकर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे भेट व आरोग्य सेवांचा आढावा

Jalna Nayak    11-Nov-2026
Total Views |

आरोग्य केंद्र आष्टी येथे भेट
 
आरोग्य सेवा अधिक सक्षम करून, गुणवत्तापूर्ण द्याव्यात - आयुक्त संजय काटकर
जालना: वैद्यकीय सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांनी दिले. वरिष्ठ स्तरावरून मिळालेले मार्गदर्शन निश्चित प्रेरणादायी ठरणार असल्याचे उपसंचालक डॉ कांचन वानेरे यांनी स्पष्ट केले. आयुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग संजय काटकर व उपसंचालक डॉ. कांचन वानेरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे भेट देऊन आरोग्य विभागाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आरोग्य संस्थेतील विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ व इतर प्रशासकीय बाबींची पाहणी करण्यात आली. तसेच आरोग्य संस्थांमधील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्याम राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोळेगावकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM) रावसाहेब शेळके, RBSK टीम, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.