कॉंग्रेसने संविधानाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये - जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे

Jalna Nayak    16-Nov-2026
Total Views |
 
भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे
 
 
भाजपा जालना महानगर राष्ट्रचिंतन संवाद बैठक संपन्न
राहुल गांधींनी अराजकतेऐवजी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काम करावे - खा. डॉ. अजित गोपछडे
जालना : लोकशाही वाचवा - अराजकता हटवा अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी जालना महानगर च्या वतीने राष्ट्र चिंतन संवाद बैठक आज दि.१६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वा भाजपा जालना महानगर प्रभारी खा.डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, रामेश्वर पाटील भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, सभापती अशोक पांगारकर, जिल्हा सरचिटणीस अमोल कारंजेकर, शिवप्रकाश चितळकर, वसंत शिंदे, सुनील पवार, अरुणाताई जाधव, डॉ. मिसाळ, अर्जुन गेही, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शुभांगीताई देशपांडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद भताने, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश केरकळ, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, संजय डोंगरे, अमोल धानुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा. डॉ. गोपछडे म्हणाले की, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कमपणे कार्यरत आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासोबतच विकासाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. मात्र, विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी यांनी जंतरमंतर मैदानावर आंदोलन करून देशात अराजकता निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काम करावे आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात असे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, संविधान हे देशाच्या एकतेचे, अखंडतेचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, न्याय आणि स्वातंत्र्य दिले आहे. मात्र काँग्रेसकडून याच संविधानाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असून, जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. संविधानाच्या नावाखाली वारंवार खोटे कथानक मांडून केंद्र सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधान हे संपूर्ण देशाचा अभिमान आहे. त्यामुळे संविधानाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचे आणि देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचे राजकारण काँग्रेसने थांबवावे. देशाच्या एकतेशी आणि संवैधानिक संस्थांशी संबंधित विषयांवर राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून जबाबदारीने भूमिका मांडली पाहिजे, असेही भास्कर आबा दानवे यांनी सांगितले
यावेळी नगरसेवक महावीर ढक्का, महेश निकम, रमेश गौरक्षक, कल्याण भदनेकर, शशिकांत घुगे, भगवान चांदोडे, शिवराज नारीयलवाले, संजय पाखरे, सिद्धिविनायक मुळे, सुशीलाताई दानवे, अड रिमा खरात, पूनम स्वामी, सखुबाई पणबिसरे, वर्षा राऊत, सुलोचना गोर्डे, रूपा कुरील, स्नेहलता कामड, पदमा मानधनी, वैशाली बनसोडे, विष्णू डोंगरे, जिवन सले, प्रियंका भूरेवाल, विजय कामड, सोमेश काबलिये, परसराम तळेकर, काकासाहेब घुले, गजानन खरात, सुधाकर खरात, राजाराम जाधव, सिद्धेश्वर हाजबे, प्रा.राजेंद्र भोसले, सुहास मुंडे, विजय पवार, विकास कदम, मनोजकुमार जोशी, संजय भगत, मनोज इंगळे, रवि कायंदे, बद्रीनाथ वाघ, सुमित सुरडकर, करण निकाळजे, निलेश गवळी, कैलास सोळुंके, अजित मानधनी, विठ्ठल इंदलकर, राजेश स्वामी, रोहित भूरेवाल, दत्ता जाधव, सुखदेव महाराज गोरे, हरिभाऊ गोरे, गुलाब पणबिसरे, सुधाकर शिंदे, शाम उगले, महादेव कावळे, संदीप नाईकवाडे, अमोल भवर, विष्णू राठोड, पंकज किल्लेदार, यश खरात, अकबर परसुवाले, या बैठकीस भाजपाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.