पाचव्या आवर्तनासाठी आमचा आग्रह कायम!
पहिले आवर्तन 5 नोव्हेंबर पासून सुटणार..!
छत्रपती संभाजीनगर येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आणि उन्हाळी हंगामासाठी दोन, अशी एकूण पाच आवर्तने सोडण्याची आग्रही मागणी माजी मंत्री राजेश टोपे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा विषय लावून धरला होता. अखेर या मागणीला यश आले आहे. सोमवारी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडलमात्र, बैठकीत चार आवर्तनांचे नियोजन करण्यात आले असून, उन्हाळ्यातील उर्वरित पाचव्या आवर्तनाबाबत जानेवारी महिन्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.पहिले आवर्तन दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणार आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा तसेच पिण्याच्या पाण्यासह इतर अनिवार्य गरजांचा विचार करता सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन आणि उन्हाळी हंगामात दोन, अशी एकूण पाच पाणी आवर्तने देणे शक्य आहे. त्यामुळे कोणतीही सबब न सांगता शेतकऱ्यांना पाचही आवर्तने मिळालीच पाहिजेत, ही आमची ठाम आणि आग्रही भूमिका आहे.
धरणातील उपलब्ध पाण्याचा योग्य वेळी वापर झाला नाही, तर वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा हे पाणी दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी वापरणे अधिक आवश्यक आहे. यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. अशा कठीण परिस्थितीत किमान रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा तसेच ऊस पिकांना पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात उत्पादन घेता येईल आणि त्यांच्या वर्षभराच्या आर्थिक गरजा भागविण्यास मदत होईल. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नागरिकांसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. त्यामुळे गोदावरी नदीवरील बॅरेजेसमध्येही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आाला आहे. जायकवाडीचे पाणी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे! दुष्काळग्रस्त शेतकरी, नागरिक आणि पशुधनाची तहान भागविण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन झाले पाहिजे.