जालना जिल्ह्यातील आजच्या पाच टॉप बातम्या वळूच्या हल्ल्यात जखमी वृद्धाचा अखेर मृत्यू

Jalna Nayak    23-Nov-2026
Total Views |

जालना महापालिकेची
 
वळूच्या हल्ल्यात जखमी वृद्धाचा अखेर मृत्यू
जालनाः मस्तगड परिसरात तीन दिवसांपूर्वी एका मोकाट वळूने केलेल्या हल्ल्यात दिलीप राठोड हे गंभीर जखमी झाले होते. राठेड यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आहे. सोमवारी दुपारी राठोड यांचा मृत्यू झाला. राठोड यांच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदर असल्याची भावना कुटुंबियांनी व्यक्त केली असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
 
वादळी चर्चेनंतर महापालिकेच्या सभेत सर्वच विषयांना मंजुरी
जालना महापालिकेची सोमवारी सकाळी सर्वसाधारण सभा झाली. सुरूवातील झालेल्या वादळी चर्चेनंतर सर्वच विषय अनुमोदनाने मंजूर झाले. काही नगरसेवकांना बोल न दिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर पाणीपुरवठा सभापती पुनम स्वामी यांनी संताप व्यक्त करून सभागृह सोडले. मोकाट जनावरे, घंडागाडी, पाणी गळती आदी विषयांवर जोरदार चर्चा झाली.
 
तालुका पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी
जालना तालुका पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सोमवारी सकाळी केली. यावेळी गुन्हे तपास इतर बाबींची तपासणी करण्यात आली.
 
अंबड शहरात 52 हजारांचा शस्त्र साठा जप्त
अंबड शहरात कोर्टरोडवर बेकायदेशीर असा शस्त्रसाठा अंबड पोलिसांनी सोमवारी सकाळी जप्त केला. यात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तलवारी, कोयते आणि कट्यार आदी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
 
प्रेमीयुगुलाचे पलायन; जाफराबाद पोलीस ठाण्यात आश्रय!
टेंभुर्णी : जाफराबाद शहरात एका प्रेमीयुगुलाने घरातून पलायन करून थेट जाफराबाद पोलीस ठाणे गाठल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती काही वेळ गोंधळाचे निर्माण झाले होते.