अंबडः कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायऱ्यांवर 11 हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दीपोत्सव समितीच्या वतीने हा सोहळा पार पडला. याप्रसंगी तहसीलदार सोमेश मोहिते यांनी सपत्नीक आरती केली. दीपोत्सव समितीचे लक्ष्मण देशमुख,दिवाकर जोगळादेवीकर, संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे, संस्थान कर्मचारी नामदेव राठोड, गोविंद कायस्थ, शिंदे उपस्थित होते. यावेळी जामदरे यांनी सुंदर अशी रांगोळी काढली.