माळीपुरा परिसरात गावठी पिस्तूल वजिवंत काडतुसासह एकास अटक

Jalna Nayak    24-Nov-2026
Total Views |
 

माळीपुरा परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल 
 
जालना - जालना शहरातील माळीपुरा परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मंगळवारी ( दि. २४) कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे व सहकारी शहरात पेट्रोलिंग करीत असताना माळीपुरा परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.या माहितीची उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना कल्पना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव नाजिम अय्युब शेख (वय ४०, रा. सुंदरनगर, चंदनझिरा, जालना) असे आहे. पोलिसांनी ४५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे तसेच पोलीस कर्मचारी सदा राठोड, सचिन चौधरी, धनाजी कावळे, मतीन शेख, दिलीप गायकवाड व इम्रान खान यांनी केली.