दोन व तीन डिसेंबर रोजी जालना शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Jalna Nayak    28-Nov-2026
Total Views |

जालना महापालिकेची
पाण्याचा वापर काटकसरीने करुन पाण्याचा अपव्यय टाळावा- आयुक्‍त
जालना - शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्‍यात येते की, जालना शहर महानगरपालिकेमार्फत जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण व अंबड येथील पंपिंग स्टेशनमध्‍ये मुख्‍य पाईपलाईन जोडण्‍यासाठी व आवश्‍यक ते तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहे. तसेच जायकवाडी-जालना मुख्‍य पाईपलाईनवर एयरवॉल्‍वची दुरुस्‍ती व बदली करणे कामी सदरील कामे सुरक्षितरित्या व तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित पंपिंग स्टेशनचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.
उपरोक्त सर्व कामे एकाच कालावधीत पूर्ण करून पाणीपुरवठा यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने दिनांक 02 डिसेंबर ते 03 डिसेंबर 2026 या कालावधीत सलग शटडाऊन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील कामे लवकरात लकवर पुर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्‍यात येईल.
त्यामुळे सदर कालावधीत जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. परिणामी, नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे.
तरी जालना शहरातील सर्व नागरिकांनी सदर शटडाऊन कालावधी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.