ग्रामीण भागाच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; शिंदे सिल्क इंडस्ट्रीज प्रा. लि.चा दिमाखदार शुभारंभ!

जालनाई सिल्क ब्रॅन्ड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपास यावे

Jalna Nayak    04-Nov-2026
Total Views |
 
 शिंदे सिल्क इंडस्ट्रीज
 
वरुडी (ता. बदनापूर) येथील शिंदे सिल्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कंपनीच्या कामकाजाची तसेच सुरू असलेल्या औद्योगिक उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. जालनाई सिल्क ब्रॅन्ड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपास यावे यासाठी मी प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम मिळावे, त्या स्वावलंबी व सक्षम व्हाव्यात यासाठी मी करत असलेल्या प्रयत्नाला यश मिळावे याकरिता महिलांना आशीर्वाद मागितले.
या प्रसंगी आमदार नारायणराव कुचे, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण फुके पाटील, महादू गिते, हरिचंद बाबा शिंदे, भगवान बारगजे, भगवान मात्रे, सरपंच राधाकिसन शिंदे, एकनाथराव जायभाये यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागात उद्योग उभे राहणे ही केवळ आर्थिक घडामोड नसून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी, पूरक व्यवसायांना चालना आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाची नवी आशा आहे.
बदनापूर तालुक्यात औद्योगिक विकासाची नवी दालने खुली होत असून, अशा उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम व्हावी, हीच अपेक्षा!
 

 शिंदे सिल्क इंडस्ट्रीज