शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ नोव्हेंबरला जालन्यात

Jalna Nayak    07-Nov-2026
Total Views |
 
आमदार अर्जुन खोतकर यांचे आवाहन!
 
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत साजरी करणार दिवाळी!

संकटात सापडलेल्या बळीराजाशी साधणार थेट संवाद; मौजपुरी येथील रामेश्वरी महादेव संस्थान परिसरात शेतकरी कुटुंबांची घेणार भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचे आवाहन!
जालना, : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक विविध अडचणींचा सामना करीत असताना, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता जालना विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.
जालना तालुक्यातील मौजपुरी येथील श्री रामेश्वरी महादेव संस्थान येथे उपमुख्यमंत्री शिंदे हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी, शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, पशुधनासाठी चाऱ्याची समस्या, रोजगाराचा प्रश्न आणि आर्थिक संकट यांसह विविध समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर परिसरातील शेतकरी कुटुंबांसोबत दीपावली साजरी करून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार आहेत.
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला, तरी दुष्काळाच्या संकटामुळे अनेक शेतकरी कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतातील उत्पन्नावर परिणाम झाल्याने शेतमजुरांच्या रोजगारावर, तसेच ग्रामीण भागातील छोटे व्यापारी व व्यावसायिकांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे. ज्यांना शेतीच नाही केवळ मजुरी करून अथवा छोटा मोठा व्यवसाय करून पोट भरतात अशा लोकांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेणे, त्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे आणि त्यांना आधार देणे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
दिवाळीच्या आनंदापेक्षा संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या घरातील चिंता दूर होणे अधिक महत्त्वाचे आहे. याच भावनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी कुटुंबांशी संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणींवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे.
या दौऱ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने शिवसेना उपनेते, माजी मंत्री तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. श्री. अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला.
यावेळी आमदार खोतकर म्हणाले की, "दुष्काळामुळे आपल्या बळीराजाच्या घरातील दिवाळीचा आनंद हिरावला गेला आहे. अशा वेळी त्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांच्या व्यथा ऐकणे आणि त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शेतकरी कुटुंबांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी येत आहेत. या भेटीतून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास आहे."
शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भागातील छोटे व्यापारी व व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना या दौऱ्यात प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जालना विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधव, शेतमजूर, नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांनी सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मौजपुरी येथील श्री रामेश्वरी महादेव संस्थान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अर्जुन खोतकर यांनी केले आहे.
यां बैठकीस खालील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भातील बैठकीस माननीय आमदार हरिभाऊजी लहाने, भास्करराव अंबेकर, अनिरुद्ध खोतकर, अभिमन्यू खोतकर, पंडितराव भुतेकर, भाऊसाहेब घुगे, ए.जे.पाटील बोराडे, विष्णू पाचफुले, ॲड. भास्कर मगरे, सुनील किनगावकर, सौ. दर्शनाताई झोल, कालिंदाताई ढगे, रोहिणी पिंपळे, अमोल ठाकूर, भगवान अंभोरे गणेश मोहिते, पांडुरंग डोंगरे, मुरलीआबा थेटे, वसंतराजे जाधव, बापूराव जाधव, आप्पासाहेब उगले अशोकराव डेंगळे, विठ्ठलराव पडुळ, किसन राठोड, राहुल गवारे, कमलाकर कळकुंबे, कमलेश खरे, दिनेश भगत, दुर्गेश काठोटीवाले, संजय डुकरे, हरिभाऊ शिंदे, संजय शेजुळ, कृष्णा डोंगरे, विष्णू ढोकळे, रामूकाका डोंगरे, अरुण डोंगरे, आप्पासाहेब डोंगरे, नरसिंग गोरे, नागेश डवले, बळीराम घुले, काशिनाथ जाधव, सचिन देशमुख, रमेश जाधव, अनिल राठोड, संजय वाघ, प्रभाकर घडलींग, सर्जेराव शेवाळे, बबनराव खरात, गणेश भुतेकर, अशोक ढेंगळे, गजानन शेजुळ, संजय राठोड, लक्ष्मण चव्हाण, सुधाकर ढोकळे, गोपाल डोंगरे, सिद्धार्थ मोरे, भाऊसाहेब गोरे, रमेश शिंदे,किशोर शिंदे, प्रकाश घोडे शिवाजी शेळके जफर खान संतोष सांगळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.