वालसावंगी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते . १५ ऑगस्ट चे अवचित्य साधून या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कागदांपासून आकर्षक फुलांची निर्मिती केली.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेली सुंदर फुले हातात घेऊन उत्साहात सहभाग नोंदविला.या उपक्रमाला सौ. बोडखे मॅडम यांनी मार्गदर्शन केले असून या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता, कलाकौशल्य, आत्मविश्वास आणि सहकार्याची भावना विकसित होण्यास मदत झाली. यावेळी बालाजी शिक्षण संस्थेचे मा. अध्यक्ष श्री बाळासाहेबजी कोथलकर, उपाध्यक्ष श्री अनिलकुमारजी लाठे, सचिव श्री संजयजी कोथलकर व बालाजी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गुजर सर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री फुसे सर यांची सुद्धा उपस्थिती होती. मु.अ गुजर यांनी मुलांच्या हातकलेची प्रशंसा करत आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेला संघर्ष थोडक्यात मुलांना सांगितला. तसेच या उपक्रमाप्रसंगी
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या हातातील रंगीबेरंगी फुले या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारी ठरली.
“पुस्तकी ज्ञानासोबत कृतीतून शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो,” हा संदेश या उपक्रमातून मिळाला.