जालना महानगर पालिकेचे श्रीमंत बाजीराव पेशवे चौकाच्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष

श्रीमंत बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त अभिवादन

Jalna Nayak    18-Aug-2026
Total Views |
 
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 326 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
 
जालनाः ब्रह्मास्त्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मंगळवार, दि. 18 ऑगस्ट रोजी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 326 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम माजी नगरसेवक विजय पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. जगन्नाथ कातारे, अमित कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, संभाजीराव नागे, रमेश गव्हाणे, अनिल वाहूळे, अशोक सोनवणे, संजय महाराज संगमुळे, नितीन जोशी आदींची उपस्थिती होती.दरम्यान, कसबा भागातील विठ्ठल मंदिर जवळ असलेला हा चौक गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. वेळोवेळी अनेक पुढाऱ्यांनी चौकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करू असे म्हणून वेळ मारून नेली प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थेच आहे. थोडक्यात या चौकाच्या नूतनीकरणाकडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक विजय पवार यांनी स्वखर्चातून चौकाचे नूतनीकरण केले होते. मात्र पालिकेने या चौकाचे कायमस्वरूपी सुशोभीकरण करण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरातील विविध चौकांचा नूतीनकरणाचा धडका सुरू असातना पेशवे चौकाकडे जाणूनबजून दुर्लक्ष होत आहे का असा आरोप समाजबांधवांमधून केला जात आहे.