अंबडच्या श्री मत्स्योदरी देवीला दहा लाख ४१ हजार पाचशे रुपयांचे दान

सोने चांदीच्या दागिन्यांचाही समावेश

Jalna Nayak    19-Aug-2026
Total Views |

तहसीलदार सोमेश मोहिते यांच्या उपस्थितीत काल दि. १७ रोजी सकाळी १२ वाजता उघडण्यात आली.
अंबड,प्रतिनिधी -अंबड येथील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री मत्स्योदरी देवीची दानपेटी डिसेंबर नंतर सुमारे आठ महिन्यानंतर संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार सोमेश मोहिते यांच्या उपस्थितीत काल दि. १७ रोजी सकाळी १२ वाजता उघडण्यात आली. यामध्ये रोख रक्कम १० लाख ४१ हजार ५७६ रुपये तसेच सोने चांदीचे विविध अलंकार भक्तांनी दान केल्याचे मोजमाप करते वेळी आढळून आले.
यावेळी मत्स्योदरी देवी संस्थानचे सचिव तथा नायब तहसीलदार एकनाथ भोजने,संस्थान विश्वस्त पुजारी गिताविलास कुंटेफळकर,संस्थान व्यवस्थापक कैलास शिंदे,सुरेंद्र पोतदार,उमेश काळवणे,मुकेश गोसावी, आंबादास भवर,गोविंद कायस्थ,अरुण भवर,,अर्जुन शिंदे,नामदेव राठोड,डिंगाबर खरात,महेंद्र खरात यांची उपस्थिती होती.
मराठवाड्याचे अराध्य दैवत असलेल्या श्री मत्स्योदरी देवीच्या दर्शनाला नवरात्र महोत्सवासह वर्षभर भाविकांची मांदीयाळी असते. डिसेंबर नंतर ८महिन्यात आलेल्या देणगीची मोजमाप मत्स्योदरी संस्थानच्या वतीने काल सकाळी १२ वाजता करण्यात आली. संस्थानच्या वतीने दानपेटी उघडून प्राप्त झालेले नगदी स्वरूपाचे दान उपस्थितांच्या हस्ते मोजमाप करण्यात आले. १० लाख ४१ हजार ५७६ रुपये तसेच सोने चांदीचे विविध अलंकार भक्तांनी दान केल्याचे मोजमाप करते वेळी आढळून आले.
मौल्यवान वस्तू........
सोन्याची पोत त्यामध्ये सोन्याचे ६५ मणी व सोन्याचे पॅन्डल,सोन्याचे छोटे ५ डोरले,सोन्याचे लहान मणी 43 नग,सोन्याची लहान प्रतीमा १ नग,चांदी पॉलीश घोडे - २ नग.,चांदीचे भरीव लहान मोठे टीपके १६ नग,मोती १ नगू,चांदीचे लहान मोठे, डोळे ८ नग,चांदीचे जोडवे लहान मोठे ५ नग,चांदी पॉलिशचे लहान मोठे डोळे १८ नग,चांदीचा १ रुपया