बदनापूर : किशोर सिरसाठ
बदनापूर : तालुक्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या बदनापूर शहरातील शुक्रवारचा आठवडे बाजार सध्या अक्षरशः लपंडावाचा खेळ ठरत आहे. कधी जुनी जागा, कधी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर, तर कधी बालाजी मंदिर परिसरात बाजार भरत असल्याने व्यापारी, विक्रेते आणि ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एकेकाळी सुमारे २५ गावांचा प्रमुख आठवडे बाजार म्हणून ओळख असलेल्या बदनापूरच्या बाजारपेठेचे महत्त्व आता हळूहळू कमी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे बाजारांचा लपंडाव खेळ कधी बंद होणार नेमकं नगरपंचायत मध्ये मालक कोण हा प्रश्न देखील गुलदस्त्यात आहे ठोस भूमिका नाही निर्णय क्षमता नाही आणि केवळ नगरपंचायत नवापूर ते आहे का असं देखील आता चर्चा रंगू लागले आहे.
प्रत्येक बाबतीत नगरपंचायत अपयशी खरंतर नाही ना असं देखील आता नागरिकांना वाटू लागले..
नेतृत्व आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव?
आठवडे बाजाराच्या नियोजनावरून स्थानिक राजकीय नेतृत्व आणि नगरपंचायत प्रशासनात पुरेसा समन्वय नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. याचा परिणाम बाजारपेठेच्या नियोजनावर होत असून, आजूबाजूच्या गावांमध्येच बाजारपेठा उपलब्ध होऊ लागल्याने बदनापूरकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी होत असल्याचे *स्थानिक नागरिक रमेश पवार* यांनी सांगितले.
भाजीपाला गटाराशेजारी, बूट-चप्पल मात्र हॉलमध्ये
बाजारातील विस्कळीत व्यवस्थेवर *स्थानिक नागरिक* *ज्ञानेश्वर शिनगारे* यांनी नाराजी व्यक्त केली. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित भाजीपाला रस्त्याच्या कडेला व गटाराशेजारी विकला जातो; तर बूट-चप्पलसारख्या वस्तू व्यवस्थित एसी दुकानांमध्ये विकल्या जातात. बाजार नियोजनात हा विरोधाभास दूर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. केवळ नागरिकांच्या जीवाशी खेळ तर नाही ना आरोग्य धोक्यात आहे
छोट्या विक्रेत्यांचा ‘चेंडू’
कैलास खैरे, भाजीपाला विक्रेते: बाजाराची जागा वारंवार बदलत असल्याने सर्वाधिक फटका छोट्या विक्रेत्यांना बसत आहे. पार्किंग, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा नसल्याने ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. विक्रेत्यांसाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करावी.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काय?
आठवडे बाजार मार्केट कमिटीच्या आवारात भरविण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची चर्चा असताना प्रत्यक्षात बाजार कुठे भरतो, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. *राहुल जऱ्हाड, स्थानिक नागरिक* यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची पाहणी करावी, अशी मागणी केली जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच पालन झालं नाही तर आंदोलन केल्या जाईल असा इशारा देखील देण्यात आल.
बदनापूरची बाजारपेठ वाचविण्याची गरज
तातेराव शेळके, ग्राहक : तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी, स्वच्छ आणि सुसज्ज आठवडे बाजार असणे गरजेचे आहे. बाजारपेठेची जागा निश्चित करून पार्किंग, स्वच्छतागृहे, पाणी व विक्रेत्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने निर्णय घेण्याची गरज आहे.
आता जिल्हा प्रशासन लक्ष देणार का?
आठवडे बाजाराच्या जागेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करून व्यापारी, ग्राहक आणि छोट्या विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी होणार का, याकडे बदनापूरकरांचे लक्ष लागले आहे. जुन्या जागी आठवडे बाजार भरण्यासाठी पुन्हा एकदा नगरपंचायती तयारी दर्शवली परंतु त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे अस्वच्छतेच्या ठिकाणी भाजीपाला विक्रेते आणि बाजार भरणार का ?