जालना आरटीओ कार्यालयातील फिटनेस सेंटरचा बोजवारा

वाहनचालकांतून तीव्र संताप, खाजगी एजन्सीकडून होते तपासणी

Jalna Nayak    20-Aug-2026
Total Views |

वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
जालनाः येथील सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय म्हणजेच आरटीओ कार्यालयातील फिटनेस सेंटरचा बोजवारा उडाला आहे. काही महिन्यांपूर्वी शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून सुसज्ज व अत्याधुनिक असे हे केंद्र उभारले होते. प्रत्यक्षात येथून गतीने कामे होण्याऐवजी वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आरटीओ कार्यालयाच्या परिसरात हे केंद्र असून एका खाजगी एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. खाजगी एजन्सीचे दहा ते बारा कर्मचारी येथे असून ते वाहनांची चाचणी म्हणजेच परिपूर्ण फिटनेस टेस्ट घेतात. पूर्वी आरटीओ अधिकारी हे काम करत.आता सुसज्ज यंत्रणा असूनही केंद्रातून चाचणी निकाल येण्यास मोठा वेळ लागत आहे. एक ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत एक किंवा दोन वाहनांचे चाचणी प्रमाणपत्र आल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाकडून वाहनचालकांच्या हितसाठी हे केंद्र असले तरी चाचणी अहवालास प्रचंड विलंब लागत आहे. दरम्यान आरटीओ अधिकारी व संबंधित चाचणी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्येही समन्वय नसल्याचे चित्र आहे.