जालना- श्रीराम संस्कृत विद्यालय(पाठशाला),ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय व अखिल भारतीय शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठान, जालना यांचा संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थांसाठी आयोजित इयत्ता ३ री व ४ थी च्या स्पर्धा दिनाक २१/०८/२०२६,शुक्रवार रोजी संपन्न झाल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक,जालना व म.न.पा. पाणी पुरवठा, शिक्षण व विद्युत समिती सदस्य दुर्गेश कठोठीवाले, भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते व नगरसेवक सिध्दीविनायक मुळे,अॅड.राहुल चव्हाण,ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे सचिव श्रीकांत शेलगावकर यांची उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षक म्हणून सौ. कल्याणी कुलकर्णी व पंडित सुधाकर वाहेगावकर यांनी काम पहिले.
दिनांक-१९/००८/२०२६ रोजी झालेल्या इयत्ता ५ वी व ६ वी च्या अकरा विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दुर्गेश कठोठीवाले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांना संस्कार व शिक्षण मिळायला पाहिजे. ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय हे फक्त पुस्तकांचे भांडार नसून संस्कार देणारी शिदोरी आहे कारण या ग्रंथालयात लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ग्रंथाचा खजिना उपलब्ध आहे. संस्कृत स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची तयारी होते.

सिध्दीविनायक मुळे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, संस्कृत भाषा शिकल्याने बोलण्याची पध्दत सुधारुन भाषा शुध्दी येते. संस्कृत भाषेच्या अध्यनाने इतर भाषा अवगत करता येतात.संस्कृत दिनानिमित्ताने आयोजित संस्कृत स्पर्धेचा उपक्रम सुंदर आहे. संस्कृत भाषेला स्पीच थेरपी देणारी भाषा देखिल म्हणतात. संस्कृत भाषा शिकल्याने पायापासून ते मस्तकापर्यंचा व्यायाम होतो. संस्कृत भाषा शिकल्याने मी शाळेमध्ये पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी होतो. संस्कृत भाषेचे अध्ययन केल्याने सभा धिटपणा येतो. संस्कृत भाषा शिकल्याने बुध्दी तल्लक होऊन बोलतांना अडखळत नाही. विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेकडे स्कोरिंगचा विषय न पाहता संस्कृत ही भाषा शिकावी. संगणकासाठी उपयुक्त संस्कृत भाषा आहे. अॅड. राहुल चव्हाण मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कष्ठाने, अभ्यासाने मोठे व्हावे तसेच विद्यार्थ्यांना मोठे होण्यासाठी पालकांनी त्यांना योग्य दिशा द्यावी. मी या वाचनालयाचा वाचक आहे व मला लेख लिहण्याची प्रेरणा श्रीराम वाचनालयाच्या माध्यमातून मिळाळी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कीर्ती शेलगावकर यांनी मानले.याप्रसंगी हरेश शेलगांवकर, प्रणव किनगांवकर, सचिन महाजन, योगेश देवावाले, प्रमोद बागडी, सुर्यकांत रत्नपारखे, प्रसाद मगरे, पांडूरंग वाजे, पद्मिनी सुरंगीळीकर,शैलेंद्र बदनापूरकर यासह विद्यार्थी,पालक,संस्कृत शिक्षक,वाचक वर्ग उपस्थित होता.