जालना - दिव्यांगाच्या हितासाठी झटून धडाकेबाज सामाजिक कार्य करणाऱ्या नगरसेविका ॲड. रीमा खरात यांना भविष्यात संधी देऊन सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज येथे दिले.
ॲड. रीमा खरात व संदीप खरात यांनी छत्रपती संभाजी महाराज उद्यानात दिव्यांगासाठी सुरू केलेल्या नवीन उपक्रमात ते बोलत होते. जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे, स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर, नगरसेवक अक्षय गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल, नगरसेवक शशिकांत घुगे, माजी नगरसेवक जीवन सले, इंजिनिअर एस. एन. कुलकर्णी, संजय देठे, अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे आदींची यावेळी विशेष उपस्थित होती.
यावेळी बोलतांना गोरंट्याल पुढे म्हणाले की,छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात दिव्यांग बांधवांसाठी आपणही एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. आपण कन्याकुमारीपासून ते जम्मूपर्यंत व पश्चिम बंगालपासून ते गुजरातपर्यंत दौरे केले असून, दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच कार्यक्रम आपण पाहून आपण समाधानी झालो आहोत. कार्यक्रमाचे आयोजन आणि दिव्यांग बांधवांसाठी करण्यात येत असलेल्या कार्याचे कौतुक करत गोरंट्याल यांनी ॲड. रीमा खरात यांना भविष्यात संधी व सहकार्य करण्याचे आश्वासन देत दिव्यांगाच्या विशेष कार्यक्रमाचा एक दिवसाचा संपूर्ण खर्च आपण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. दिव्यांगांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी महापौर वंदना मगरे यांनी जालना शहरात दिव्यांगाच्या हितासाठी सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक सांगितले.
यावेळी बोलतांना ॲड. रीमा खरात यांनी म्हणाल्या की, जालना शहरातील दिव्यांग बांधवांसाठी मालमत्ता करात ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली होती. या मागणीला महापौर वंदना मगरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, आपणास जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधून निवडून येण्याची संधी केवळ दिव्यांग बांधवांच्या आशीर्वादामुळे मिळाली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्याला राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी दिली असून, दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिव्यांगाच्या हितासाठी महापौर वंदना मगरे यांनी ५१ हजार रुपये, एस. एन. कुलकर्णी यांनी ५१ हजार रुपये, माजी नगरसेवक जीवन सल्ले यांनी ५१ हजार रुपये, तर संजय देठे यांनी ११ हजार रुपये देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश काकडे, अलोक सारवडीकर, मनोज झिने, विशाल वाघमारे, हर्षल काळे, सोहेल शेख, सागर म्याका,तेजस्विनी दाभाडे, आकाश दाभाडे, साळवे बाबा आदींनी परिश्रम घेतले