१३ तासात ३०० किमी सायकलिंग पूर्ण :

जालन्याचे कैलास झोळगे ठरले पोडियम फिनिशर

Jalna Nayak    23-Aug-2026
Total Views |

या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत १४ तास ३० मिनिटात सदर अंतर पूर्ण
 
 
जालना- व्हिएतनाम येथील जागतिक पातळीवर स्पर्धेत जालन्याचे नाव उंचीवर नेऊन ठेवणारे आयर्नमॅन कैलास झोळगे यांनी ३०० किलोमिटर सायकलिंग केवळ १३ तासात पूर्ण करत आणखी एका विक्रमाची नोंद आपल्या नावावर करून जालना जिल्ह्याचे नावलौकिक करत सुपर रेडओनर किताब मिळवला.एस.आर.असलेले आय.पी.एस.संजय बारकुंड यांनीही या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत १४ तास ३० मिनिटात सदर अंतर पूर्ण केले तसेच अनिरुद्ध झुंबड यांनी १८ तास १० मिनिटात अंतर पूर्ण करून सुपर रेडओनर किताब पटकावला आहे.
फ्रान्सच्या 'ऑडेक्स क्लब पॅरिसियन (ACP) या जागतिक संस्थेच्या मान्यतेने दि.१६ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील फिनिक्स क्लब येथून सकाळी ६ वाजता बी.आर.एम. सायकल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर ते बीड आणि परत छत्रपती संभाजीनगर अशी तब्बल ३०० किलो मिटर जागतिक स्तरावर अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या सायकल स्पर्धेत जालन्याच्या स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. या यशाबद्दल डॉल्फिन स्पोर्ट्स ग्रुपचे अध्यक्ष नथुमल नाथानी, प्रिन्सिपल काबरा, अर्जुन गेही, रमेश मगरे, तोष्णीवाल, अनिल मालपानी, रमेश तोतला, विठ्ठल गाडेकर, खेरुडकर, कोरके, सिद्धिविनायक झोळगे, प्रणव किनगावकर, स्पोर्ट्स ग्रुप, क्रीडाप्रेमी, सायकल संघटना, मित्र परिवार सर्व अधिकारी आदींनी आयपीएस संजय बारकुंड,आयर्नमॅन कैलास झोळगे आणि अनिरुद्ध जुंबड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हवा,ऊन,पाऊस,मात्र जिद्द कायम राखत स्पर्धेत मिळवले अव्वलस्थान
अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या जालन्याच्या स्पर्धकांनी जिद्दीच्या बळावर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हवामान,खड्डे, पाऊस,ऊन आद्रता,चढ - उताराचा आणि दुसरीकडे वेळेचे कडक बंधन अशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत जिद्द आणि अफाट सहनशक्तीच्या बळावर सदर ३०० किलोमिटरचे अंतर वेळेच्या आत पूर्ण करून कैलास झोळगे यांनी अव्वल स्थान मिळवत जालन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.