भोकरदन: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार भोकरदन तालुका काँग्रेस संघटना बळकट व सक्षम करण्यासाठी तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
जालना जिल्ह्याचे खासदार मा.कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीस काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे आणि माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. भोकरदन तालुका काँग्रेस अध्यक्ष राहुल देशमुख व शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे संयोजन करण्यात आले.
बैठकीतील प्रमुख मुद्दे व निर्णय:
संघ संघटनात्मक बांधणी: तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि बूथ पातळीवर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी मंडळ व सेक्टर कमिट्या स्थापन करण्यावर सविस्तर चर्चा झाली.
जबाबदाऱ्यांचे वाटप:मंडळ अध्यक्ष व सेक्टर अध्यक्षांची नियुक्ती करून त्यांच्यावर स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कामांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. माहिती सादरीकरण:सर्व नवन नियुक्त पदाधिकाऱ्यांची सविस्तर माहिती प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जनसंपर्क आणि समन्वय: काँग्रेसची विचारधारा, धोरणे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बदर चाऊस, अशोक उबाळे, सुनील चौधरी, शांतीलाल बनसोडे, सुभाष मगरे, अनिल देशपांडे, भाऊसाहेब सोळंके, त्रिंबक आप्पा पाबळे, रमेश जाधव, झहीर कुरेशी, भूषण जाधव, श्रवणकुमार अक्से, अशोक सरोदे, अजीम पठाण, एजाज पठाण, शेख रिजवान, विश्वास वाघ, शालिकराव गावंडे, साळूबा पाटील लोखंडे, सोपान सपकाळ, नदीम पठाण, शेख सलीम, दामू अण्णा वानखेडे, गुड्डू कादरी, करीम लाला, विष्णू भालेराव, दादाराव भोंबे, फकीरा शिरसाट, किरण कोळी, नानासाहेब जाधव, शेख जुनेद, संतोष ठाकरे, समाधान ठाले, राजीव जाईबहार, अण्णासाहेब ठाले, शेख सादिक, गणपत ठाले, विष्णू सुरसे, शिवाजी वाघ, ईश्वर गावंडे, दीपक सोनवणे, बाबासाहेब इंगळे, किशोर शिंदे, इब्राहिम पठाण, नितीन साळवे, केतन साळवे, ज्ञानेश्वर गिरणारे, हर्षल शिरोळे, प्रशांत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय एकता, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक सलोखा मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असणाऱ्या सर्व नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीच्या शेवटी करण्यात आले.