जालना : त्रैमासिक 'तिफण', तिफण वाचक चळवळ, भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद यांच्या संयुक्त सहकार्याने ' तिफण' लेखक-वाचक,रसिक मेळाव्याचे रविवारी ( ता.३०) आयोजन करण्यात आले आहे.
अंबड तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबुवंतगड (जामखेड) येथे आयोजित मेळाव्याचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे यांच्या हस्ते होईल.अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक उत्तम बावस्कर हे राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबडचे अवधूत नाना खडके तर स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते कल्याणराव खडके उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विजय भोसले (शिवाजी विद्यालय, कत्रड), डॉ. सर्जेराव जिगे (अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ), दगडू भोजने (अध्यक्ष, जांबुवंतगड संस्थान), प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव (विवेकानंद महाविद्यालय, मंठा), अॅड. संजय खोरे (अध्यक्ष, यशवंत प्रतिष्ठान) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात 'तिफण उत्कृष्ट वाचक पुरस्कार' भारत सोनवणे यांना, डॉ. अंबादास सगट व अॅड. कृष्णा जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट लेखकांचा विशेष सत्कारात सुनील डोके, हबीब भंडारे, पांडुरंग गिराम, अशोक गायकवाड, ज्ञानेश्वर गायके, देवानंद पवार, किशोर जऱ्हाड, सुनिल उबाळे, प्रमोद पठारे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मेळाव्यात - सत्र १ ले (१२.०० ते १२.३०) परिसंवाद - विषय : मी आणि माझे वाचन-लेखन- अध्यक्ष : डॉ. राम रौनेकर राहतील. दुसऱ्या- सत्रात (१२.३० ते ०१.००) मुलाखत - तिफण साहित्य संवाद उपक्रमांतर्गत - मुलाखत : प्रख्यात चित्रकार, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू बावीस्कर यांची मुलाखत डाॅ.मारोती घुगे, डाॅ.सुहास सदाव्रते, डाॅ.यशवंत सोनुने हे घेतील. दुपारी तिसऱ्या सत्रात(०२.०० ते ०२.३०) कथाकथन (गावाकडच्या गोष्टी) ४ थे (०३.०० ते ०३.३०) तिफण कविता दरबार- अध्यक्ष : नारायण खरात हे राहतील. परिचर्चा व समारोप : विषय - उद्याची 'तिफण' (अध्यक्ष : डॉ. सर्जेराव जिगे) व समारोप सत्र दु. ४.०० वाजता प्रमुख अतिथी डॉ. दिलीप बिरुटे यांच्या उपस्थितीत होईल. कवी,लेखक,साहित्यिक,रसिक वाचकांनी
या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे संयोजक डॉ. शिवाजी हुसे (संपादक तिफण) यांनी कळविले आहे.