ब्रह्माकुमारीज् अंबड तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

ब्रह्माकुमारीज्च्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणि यांच्या स्मृतिदिन (२५ऑगस्ट) निमित्ताने

Jalna Nayak    24-Aug-2026
Total Views |

 ब्रह्माकुमारीज् अंबड सेवाकेंद्राच्या वतीन रक्तदान व मुक्त रक्त तपासणी शिबिर
 
अंबड - ब्रह्माकुमारीज्च्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणि यांच्या स्मृतिदिन (२५ऑगस्ट) निमित्ताने राजयोग शिक्षण व संशोधन संस्थेच्या समाजसेवा प्रभागाच्या निर्देशानुसार विश्वबंधुत्व रक्तदान महाअभियान २०२६ भारतभर राबविण्यात येत आहे. ब्रह्माकुमारीज् अंबड सेवाकेंद्राच्या वतीन रक्तदान व मुक्त रक्त तपासणी शिबिर जनकल्याण रक्तकेंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अंबड सेवा केंद्राच्या संचालिका मीरादीदी, जनकल्याण रक्तपेढीचे सतीश जाधव, डॉ. प्रगती तिकांडे, डॉ. रोहित भाला, उद्योजक दीपक भोरे, विजय जोशी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. दादी प्रकाशमणि यांच्या स्मृतिदिना निमित्ताने २०२५ मध्ये एक लाख रक्त युनिट संकलानाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते व ब्रह्माकुमारीज् संस्थेने अठ्यांशी हजार रक्त युनिट संकलित केले होते. या उपक्रमास प्रतिसाद मिळत असल्याने या वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे. रक्तदान जीवनदान आहे असे प्रतिपादन याप्रसंगी बी. के.मीरादीदी यांनी केले. या शिबिरात १६ व्यक्तिनी रक्तदान केले. डॉ. प्रगती तिकांडे व डॉ. रोहित भाला यांनी रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती भोरे यांनी केले तर आभार चंद्रकला दीदी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सुर्वणा कदम, राम कंटूले, योगेश अडाणी, पंजाब कदम, कल्याण देवडे, सिध्देश्वर टापरे, राम वरकड, प्रतिमा टकले, मनीषा कदम, मोनिका शहाणे यांची उपस्थिती होती.