जालना- ग्रामसभेदरम्यान हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाच्या मृत्यूच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी कामकाजावर बहिष्कार टाकून ग्रामसभा रद्द करण्याची मागणी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील गौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला . तीव्र मानसिक व शारीरिक त्रास दिला. या भीषण धक्क्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका पेऊन त्यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. आज पंचायत समिती जालना येथे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद नारायण पाटील यांच्या मृत्यू प्रकरणाचा ग्रामसभेत दाबाव वाढल्याने हृदय विकाराचा तीव्र झटका आला व त्यांचा जालना जिल्हा ग्रामपंचायत संघटनेच्या वतीने निषेध नोंदवत ग्रामसभेवर अनिश्चित काळासाठी बहिष्कार टाकण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना, महाराष्ट्र विकास सेवा राजपात्रित अधिकारी संघटना, कर्मचारी महासंघ यांनी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेस पाठिंबा दिला .
यानंतर जालना जिल्हा ग्रामपंचायत संघटनेच्या एका शिष्टमंडळाने आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. ग्रामसभा संख्या मर्यादा कायद्यात सुधारणा करून वारंवार होणाऱ्या ग्रामसभा रद्द कराव्यात किंवा वर्षातून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला फक्त एकच नियोजनात्मक ग्रामसभा घेण्याची तरतूद करावी, अनधिकृत चित्रिकरणावर बंदी ग्रामसभेत शासकीय अधिकाऱ्यांचे अनधिकृत व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बदनामी करणान्यांवर कडक कायदेशीर कारवाईचे नियम करावेत, संवेदनशील गावांमध्ये ग्रामसभेसाठी विनामूल्य पोलीस बंदोबस्त अनिवार्य करावा, इतर शासकीय विभागांच्या योजनांच्या सभांची जबाबदारी संबंधित विभागांवर सोपवावी, वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ग्रामसभेऐवजी पंचायत समिती स्तरावरून छाननी व्हावी, आदी मागण्यांचा यात समावेश आहे. यावेळी राज्य महिला उपाध्यक्ष डी पी भालके , विभागीय अध्यक्ष प्रवीण पवार , जिल्हाध्यक्ष श्री डी बी काळे, सरचिटणीस विनोद भगत, तालुका अध्यक्ष रखमाजी गोरे, तालुका सचिव महेश वझरकर, अमृत कोकाटे,शारदा साबळे, अशा बदर, सारिका तायडे, वर्षा वाघ, प्रमिला आघाव, खंडागळे , सीमा खिल्लारे, कैलास लुंगाडे, विजय राठोड, शिंगणे, रोहित गायकवाड, वैभव काळे, निकम आदींची उपस्थिती होती.