मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिस दलातील सुट्टया पाच सप्टेंबरपर्यंत स्थगित
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून हजारो मराठा बांधव या उपोषणात सहभागी होतील
Jalna Nayak 28-Aug-2026
Total Views |
जालनाः मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून उपोषणाची हाक दिली असून अंतरवाली सराटी येथे हजारो मराठा बांधव जमणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हा पोलिस दलाने अधिकारी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांची सुटी पाच सप्टेंबर रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच वाहतूक तसेच अन्य व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान कुणबी प्रमाणपत्र न दिल्यामुळे जरांगे हे 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करणार आहेत. उपोषणाची जय्यत तयारी असून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून हजारो मराठा बांधव या उपोषणात सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.