आ. अर्जुन खोतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
भोकरदन चौफुली उड्डाणपुलालगतच्या दोन्ही सर्व्हिस रोडसाठी ₹८.८८ कोटी मंजूर
Jalna Nayak 28-Aug-2026
Total Views |
जालना : जालना शहरालगतच्या देऊळगाव राजा–जालना–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरदन चौफुली येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडच्या सुधारणा कामासाठी ₹८ कोटी ८८ लाख ५३ हजार ३२४ रुपयांची (जीएसटी वगळून) प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी प्रत्यक्ष पाहणीपासून प्रस्ताव तयार करून घेणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे आणि केंद्रीय स्तरावर मंजुरी मिळविणे या प्रत्येक टप्प्यावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. भोकरदन चौफुलीवरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडची अत्यंत दुरवस्था झाल्याने वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खड्डे, धूळ आणि वाहतुकीची कोंडी यांमुळे अपघाताचा धोकाही वाढला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार खोतकर यांनी स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि तातडीने डागडुजी करून वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळवून दिला.