अंतरवालीत मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू

प्रचंड घोषणांनी परिसर दणादणला

Jalna Nayak    29-Aug-2026
Total Views |
 
 समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण उपोषणाला बसत असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले
 
जालनाः मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे तात्काळ देण्यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण यौद्धे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपोषणाला सुरूवात केली. समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण उपोषणाला बसत असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. सरकारच धोका देत असून आम्हाला आमचे आरक्षण व कुणबी जात प्रमाणपत्र पाहिजे असल्याचे जरांगे यांनी सांगितले. कुणबीप्रमाणपत्र देण्यासाठी राज्यात सर्वच ठिकाणी चालवाचालवी केली जात असल्याचा आरोप करून आता निकाराची लढाई असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. उपोषणासाठी जालना जिल्ह्यासह संपूर्ण राज्य भरातून अनेक मराठा बांधव सहभागी झाले आहेत. आज सुरू झालेले उपोषण किती दिवस चालणार, सरकार मध्यस्ती कशी करणार, सरकारचे कोण कोण मंत्री येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकार आम्हाला धोका देत असल्याचे आरोपही जरांगे यांनी केला.