जाफराबाद-माहोरा मार्गावर भीषण अपघात
रिक्षाचालकाचा मृत्यू, दोघे गंभीर
Jalna Nayak 30-Aug-2026
Total Views |
जाफराबाद-माहोरा मार्गावरील आरतखेडा फाट्याजवळ रविवारी सायंकाळी भरधाव आयशर आणि मालवाहू रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. मिरचीची वाहतूक करणाऱ्या भरधाव आयशर वाहनाने (एमएच २१ सी ३०२५) मालवाहू रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात जाफराबाद येथील रिक्षाचालक संदीप जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, रिक्षा उलटून बाजूच्या दुकानावर आदळली; त्यामुळे दुकानावर असलेले जाफराबाद येथील गणेश पंडित व विकास पंडित हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.