तिरंगा महोत्सवातून’ विद्यार्थ्यांच्या हस्तकलेचे प्रदर्शन स्पर्धा

Jalna Nayak    04-Aug-2026
Total Views |
जालना : स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सर्जनशीलता आणि हस्तकलेची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने १०० शिक्षक समूह ऑफ जालना यांच्या वतीने ‘तिरंगा महोत्सव’ हस्तकला प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून विद्यार्थ्यांनी तिरंगा, स्वातंत्र्यदिन, भारतीय संस्कृती, राष्ट्रीय एकात्मता तसेच शैक्षणिक उपयुक्तता या विषयांवर आधारित हस्तकला वस्तू तयार करून १२ऑगस्ट २०२६ पर्यंत जमा कराव्यात. स्पर्धेतील निवड झालेल्या उत्कृष्ट १०० कलाकृतींचे प्रदर्शन १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता भरविण्यात येणार असून उत्कृष्ट कलाकृतींना प्रमाणपत्र व आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राजेभाऊ मगर तसेच स्पर्धेचे समन्वयक संदीप इंगोले व अशोक माधवले सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सर्जनशीलता आणि हस्तकलेची आवड जोपासणाऱ्या या देशभक्तीपर उपक्रमात आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा.