आसई टू जर्मनी व्हाया एज्युकेशन...

नितीन इंगळे यांची जर्मनीत उच्च शिक्षणासाठी निवड

Jalna Nayak    11-Sep-2026
Total Views |

आसई गावातून शुभेच्छांचा वर्षाव
 
जालना : ऐतिहासिक युद्धभूमी आसई येथील नितीन तुळशीदास इंगळे यांची जर्मनीतील एचबीआरएस विद्यापीठातील 'एम एस्सी सोशियल, प्रौटेक्टीव या विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणारे एकमेव भारतीय विद्यार्थी असल्याने होत आहे, हे विशेष...
नितीन इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी आणि अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळुरू येथून पब्लिक पाॅलिसी अ‍ॅन्ड गव्हर्नन्स विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मेळघाटमधील आदिवासी भागासह मध्य प्रदेशातील ग्रामीण भागात सामाजिक विकास, आरोग्य, पोषण, सामाजिक सुरक्षा, शासकीय योजना आणि नागरिकांच्या हक्कांशी संबंधित क्षेत्रात काम केले आहे. या प्रत्यक्ष अनुभवातून सामाजिक संरक्षण व्यवस्थेतील आव्हाने जवळून समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली.जर्मनी देशातील एचबीआरएस विद्यापीठात एम एस्सी सोशियल प्रोटेक्शन हा सामाजिक सुरक्षा, सामाजिक कल्याण, रोजगार, गरिबी आणि विविध देशांच्या सामाजिक संरक्षण व्यवस्थांचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारा विशेष अभ्यासक्रम आहे. “मेळघाट आणि ग्रामीण भागात काम करताना सामाजिक संरक्षणाची प्रत्यक्ष गरज अनुभवली. आता जर्मनीमध्ये या विषयाचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची संधी मिळत आहे. या शिक्षणाचा उपयोग भविष्यात सामाजिक धोरणाच्या क्षेत्रात करण्याचा माझा प्रयत्न असेल,” असे नितीन इंगळे यांनी सांगितले.
ऐतिहासिक आसई गावातून जर्मनीपर्यंतचा हा शैक्षणिक प्रवास गावकरी व पंचक्रोशीतील गावांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.त्याचा याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यानंतर गावकऱ्यांचा निरोप घेऊन तो जर्मनीकडे रवाना झाला.त्याचे वडील हे सर्वसामान्य शेतकरी असून सबंध गावकऱ्यांसाठी व त्याच्या नातेवाईकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. या यशाबद्दल गावचे सरपंच विजय पाटील इंगळे, उपसरपंच दत्तू कोरडे, पोलीस पाटील कौतिकराव कोरडे, तंटामुक्त अध्यक्ष भगवान कोरडे,प्राचार्य शाळीग्राम इंगळे,रमेश इंगळे,बद्रीनारायण कोरडे, डॉ.रमेश पुंगळे, दिलीप इंगळे, भगवान इंगळे,कडुबा सहाने,डॉ.कैलास इंगळे ,डॉ. समाधान इंगळे,तुळशीराम लोखंडे,केशव पाटील जंजाळ यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
 
आजच्या काळात उपलब्ध देशी आणि विदेशी विद्यापीठातील शैक्षणिक संधी याविषयी गाव खेड्यातील तरुणांमध्ये मोठी जागरुकता निर्माण झाली आहे. पारंपरिक शेतीत वडिलांप्रमाणे आपल्याला जगता येणार नाही, म्हणून रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी तरुण नवनवीन पदव्या संपादन करीत आहे. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये उच्च शिक्षणाविषयीची ही वाढलेली आस्था , जागरुकता निश्चितच आशादायी बाब आहे."
प्रा.डॉ. कैलास इंगळे, आसईकर