परतुरात मीटरमध्ये फेरफार करत वीजचोरी; 12 जणांवर गुन्हा

सर्व आरोपींवर परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Jalna Nayak    13-Sep-2026
Total Views |

आरोपीवर अंबड‍ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
जालना : परतूर शहरात महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत 12 ग्राहक आकडे टाकून वीजचोरी करताना व मीटरमध्ये फेरफार करताना पकडण्यात आले. वीजचोरी केल्याप्रकरणी सर्व आरोपींवर परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक अभियंता राधेश्याम कुमावत व त्यांचे महादेव सोळंके, रामेश्वर भामट, जावेद शेख यांनी परतूर शहरात तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत ग्राहकांची तपासणी मोहीम राबवली. यात काही ग्राहक महावितरण कंपनीच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून व मीटर बायपास करून वीज चोरत असल्याचे आढळले. वीजचोरी करणारे सर्व नागरिक इंदिरानगरमधील‍ रहिवासी आहेत. यात बबलु मुसा सय्यद याने 9 हजार 130, साकिनाबी खय्युम शेख या ग्राहकाने 5 हजार 60, शादतखाँ जानखाँ पठाण याने याने 3 हजार 670, रुबिना शबीर शेख या ग्राहकाने 4 हजार 230, इब्राहिम इसा शेख याने 24 हजार 460, शरीफ मेहबूब शेख याने 5 हजार 530, अख्तर वजीर शेख याने 5 हजार 530, शाहिन मुसार अली या ग्राहकाने 3 हजार 450, मारिबा उमाजी याने 4 हजार 630, शेख एम.डी. अली शेख अमीर याने 6 हजार 440, अमिनाबी मतीन शेख या ग्राहकाने 4 हजार 710 व कलावती बबनराव हिवाळे या ग्राहकाने 5 हजार 960 रुपयांचे महावितरणचे नुकसान केले.
सर्व आरोपींनी एकूण 3952‍ युनिट वीजचोरी केली. वीजचोरीचे बिल 55 हजार व तडजोड आकार 28 हजार असे एकूण 78 हजार रुपये भरण्यास त्यांनी टाळाटाळ केली. सहायक अभियंता कुमावत यांच्या फिर्यादीवरून सर्व 12 आरोपींवर परतूर पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 व 138 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.