प्रकृती ठिक नसतानाही मनोज जरांगे मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज
काही वेळा मुंबईकडे प्रयाण होणार, मोजकी माणसेच सोबत
Jalna Nayak 15-Sep-2026
Total Views |
वडीगोद्रीः मराठा समामासाठी कुणबी प्रमाणपत्रे तसेच इतर मागण्यांसाठी तब्बल 18 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले आंदोलक मनोज जरांगे हे मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी मुंबई कडे निघत आहेत. महत्त्वाचे म्हणजे उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असतानाही ते मुंबईकडे निघत आहेत. जरांगे यांच्यासोबत त्यांची दोन वाहने, रूग्णवाहिका व काही मोजकी माणसे सोबत असणार आहेत. मुंबईकडे जाण्याची पूर्ण तयारी झाली असून मंगळवारी सकाळी वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. अंतरवाली सराटी येथे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने गदी असून मनोज जरांगे हे काळात वेळात मुंबई कडे निघणार आहेत. प्रवास मार्ग ठरलेला असून पाटोदा, श्रीगोंदा, खापोली मार्गे मुंबईत पोहचून ते एकटे आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासन सज्ज झाले असून ठिकठिकाणी बंदोबस्तासोबतच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.