जालना जिल्ह्यात १४४ किमीहून अधिक लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून १२२ कोटींची कामे

Jalna Nayak    15-Sep-2026
Total Views |

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली
 
जालना - ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान आणि सुलभ करण्यासाठी 'प्रधानमंत्री ग्रामसडक योजना' अंतर्गत जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १४९.०८ किलोमीटर लांबीच्या २६ कामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी १४४.२१ किलोमीटर लांबीची २५ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित १.८० किलोमीटर लांबीचे १ काम सध्या प्रगतीपथावर आहे, अशी माहिती दिशा समितीच्या बैठकीत देण्यात आली. या संपूर्ण विकासकामांवर आतापर्यंत १२,२०६.७५ लाख रुपये ( १२२ कोटी ६ लाख रुपये) खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता दिगंबर कोल्हे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक खर्च जालना तालुक्यात तर सर्वात कमी खर्च जाफ्राबाद तालुक्यात झाला आहे.

 तालुकानिहाय कामे आणि झालेला खर्च

| तालुका | एकूण कामे (संख्या) | झालेला खर्च (रू. लाखात)
जालना : ५ l १८१२.९५
बदनापूर : २ | १०३०.१२
भोकरदन : ४ | १८४१.८२
जाफ्राबाद : २ | १३१२.५२
अंबड : ३ | १८२१.३७
घनसावंगी : ४ | १८५३.०७
परतूर : ३ | ११४५.०७
मंठा : ३ | १३४९.८३
एकूण : २६ | १२२०६.७५