जालनाः जालना शहरासह यंदा महाकाय अशा मूर्तींनी जालनेकरांचे लक्ष वेधले असून बडी सडकवरील प्रत्येक मूर्ती पंधरा ते पंचवीस फूट असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा महाकाय मूर्तींच्या स्पर्धेत येथील अनोखा गणेश मंडळाने आपले अनोखेपण कायम ठेवले असून चांदी व सोन्याचा मुलामा असणारी तब्बल चार कोटींची मूर्तीची स्थापना केली आहे.
रिध्दी- सिद्धीचा दाता, विघ्नहर्ता गणराया चे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्वत्र जल्लोषात आगमन झाले. संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती प्राप्त जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात श्री अनोखा गणेश मंडळातर्फे 108 किलो वजनी चांदीची सोन्याचा (सुवर्ण) मुलामा असलेल्या दोन कोटींचा गणपती बाप्पांच्या मनमोहक मूर्तीस जल्लोष आणि थाटात विराजमान करण्यात आले.
सदस्यांनी गणपती बाप्पा मोरया,मंगल मुर्ती मोरया,,,, असा जल्लोषात गजर केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. उद्योजक रामनिवास मानधना, राहुल किशोर अग्रवाल ( रुपम) परिवारातील सदस्यांच्या हस्ते विधीवत पूजन करून आरती करण्यात आली.या वेळी उद्योजक अनिल गोयल,मंडळाचे अध्यक्ष रितेश मिश्रा,अतुल मंत्री, संस्थापक अजय ( जगदीश) भरतिया, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल ( रूपम), योगेश मानधना, गोपाल मानधना, जगदीश मुंदडा,पुरूषोत्तम भक्कड,राजेश अग्रवाल, राजकुमार दायमा,हेमंत ठक्कर, गणेश तिवारी, किशोर अग्रवाल,रोहित भुरेवाल, नितीन मुथा, मनोज बंब,अजय अग्रवाल,जय सुरा,गणेश भुरेवाल, महावीर मरलेचा,यांच्यासह मंडळाचे सदस्य, श्री भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदा ही भाविकांना वेगवेगळे देखावे, प्रसाद, कुटुंबियांसह आनंद घेता येईल असा मंडळाच्या नावाप्रमाणेच अनोखा गणेशोत्सव साजरा होणार असल्याचे संस्थापक अजय ( जगदीश) भरतिया, अध्यक्ष रितेश मिश्रा,अतुल मंत्री यांनी सांगितले.