जालन्यात मराठवाडा मुक्ति संग्राम दिन सोहळ्याला पालकमंत्री मुंडे यांची पाठ

जिल्हाधिकाऱ्यांनी केले ध्वजारोहण

Jalna Nayak    17-Sep-2026
Total Views |

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहरण करण्यात आले.
 
जालनाः मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाला जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाठ फिरविल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे बुधवारी सायंकाळी पालकमंत्री मुंडे यांचा दौरा रितसर जाहीर करण्यात आला होता. जालना शहरातील टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक परिसरात ध्वजारोहण व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र पालकमंत्री ऐनवेळी अनुपस्थित का राहिल्या बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहरण करण्यात आले.
स्थानिक पालकमंत्री नसल्यामुळे बीड येथील मंत्री तथा आ.पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. मात्र पालकमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात फार काही विशेष असे कार्य झाल्याचे अद्याप तरी चित्र नाही. बीड येथून रेल्वे सुरू होणार असल्याचे कारण सांगण्यात येत असले तरी मराठवाडा मुक्तिसंग्रामचा ध्वजारोहण सोहळा ही तेवढाच महत्त्वाचा होता अशी चर्चा सोहळा परिसरात सुरू होती.