जालनाः मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे तसेच इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून सुरू केलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी विविध घडामोडीनंतर रात्री आ.प्रसाद लाड हे अंतरवाली सराटी दाखल झाले. पंधरा ते वीस मिनिटांच्या चर्चेनंतर आ.लाड यांनी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपासह इतर मागण्या मान्य आहेत. यावर मनोज जरांगे यांनी आ. लाड यांच्या हस्ते पाणी प्याले मात्र उपोषणावर आपण ठाम असल्याचे सांगून ते सुरूच ठेवले.दरम्यान, आ. प्रसाद लाड यांची मधस्थी फळाला आली.
हैदराबाद गॅजेटनुसार गुरूवारपासून प्रमाणपत्र वाटप केले जाणार असले तरी सातारा, कोल्हापूर गॅजेटनुसार प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी हे उपोषण सुरूच राहील असा इशारा जरांगे यांनी दिला. यासाठी शासन आदेश काढण्याची सूचनाही जरांगे यांनी आ. लाड यांना केली. पाच दिवसांपासून जरांगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारचे शिष्टमंडळ येणार असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात कोणीच न आल्याने मराठा समाजाचा बांध फुटला बुधवारी वडीगोद्री परिसरात अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून राग व्यक्त करण्यात आला. बुधवारी रात्री आ. लाड यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यांनी उपोषण थांबवावे. पण जरांगे यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. मात्र काहीअंशी मागण्या मान्य झाल्यामुळे मनोज जरांगे यांनी पाणी प्राशन करून सरकारला काही अंशी होईना दिलासा दिल्याचे चित्र आहे.