मराठा आरक्षणासाठी महाकाळा परिसरात रस्तारोको

रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगा

Jalna Nayak    02-Sep-2026
Total Views |

शिष्टमंडळ आल्यशिवाय रस्ता मोकळा करणार नाही असा पावित्रा घेतला
 
जालनाः अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रे तसेच इतर मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे उपोषणास बसलेले आहेत. पाचव्या दिवशीही कोणीच फिरकले नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी महाकाळा तसेच वडीगोद्री परिसरात बुधवारी सकाळी व सायंकाळी रस्तारोको आंदोलन करून आपला राग व्यक्त केला. अचानक झालेल्या रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत. कार्यकर्ते संतप्त झाले असून शिष्टमंडळ आल्यशिवाय रस्ता मोकळा करणार नाही असा पावित्रा घेतला आहे. परिसरात मोठा फौजफाटा असून अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्यासह इतर अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून आहेत. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील छत्रपती संभाजीनगर येथील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असून त्या ठिकाणी मराठा कार्यकर्ते गेले असून शिष्टमंडळा संदर्भात काय झाले याची विचारणा केल्याची माहिती मिळत आहे. मंत्री विखे यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली.